मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...म्हणून हॅलो नाही वंदे मातरम् म्हणायचं, फडणवीसांनी सांगितलं कारण

...म्हणून हॅलो नाही वंदे मातरम् म्हणायचं, फडणवीसांनी सांगितलं कारण

मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल

मला मुख्यंमत्र्यांना पण विचारावे लागेल. पक्षातील माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल. चर्चेअंतीच कुठलाही निर्णय घेतला जाईल

ही चळवळ, आता केवळ चळवळ नसून गुलामगिरीच्या सर्व साखळ्या तोडून काढायची आहे,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India
  • Published by:  sachin Salve

वर्धा, 02 ऑक्टोबर : 'वंदे मातरम् परत आपल्याला आपल्याला व्यवहारात आणायचे आहे. हॅलो ऐवजी वंदे मातरम् असा वापर करून गुलामगिरीच्या निशाणी पुसून टाकायच्या आहे, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वंदे मातरम् मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

सर्व शासकीय कामकाजामध्ये हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणण्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत हा बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयावरून विरोधकांनी टीका केली आहे. तर आज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज वर्धा येथे "वंदे मातरम" मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

'वंदे मातरम् हा स्वातंत्र्याचा मुलमंत्र होता. बंगालची फाळणी झाली होती. त्यावेळी हजारो लोक उपस्थितीत होते. त्यावेळी लोकांची गर्दी होती, नेत्याची वाट पाहत होती. त्यावेळी एकाने वंदे मातरम् अशी घोषणा दिली. त्यानंतर सर्वच लोकांनी वंदे मातरम् ची घोषणा दिली आणि या घोषणेनंतर बंगालची फाळणी हाणून पाडली. त्या ठिकाणी आपल्या प्रत्येक क्रांतीकारक, स्वातंत्र्यसैनिकांसाठी वंदे मातरम् हा मंत्र झाला. भगतसिंग फासावर गेले होते, त्यावेळी त्यांनी मातृभूमीचे नाव घेतले आणि वंदे मातरम् म्हणून याच भारतमातेच्या चरणी सेवा करण्यासाठी जन्म मिळावा अशी प्रार्थना केली होती, असा दावा फडणवीस यांनी केला.

( गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना)

तसंच, 'आता आपल्या पुन्हा एकदा वंदे मातरम् व्यवहारात आणायचा आहे. त्यामुळे हॅलो नाही वंदे मातरम् म्हणायचं नाही. ही चळवळ, आता केवळ चळवळ नसून गुलामगिरीच्या सर्व साखळ्या तोडून काढायची आहे, असं फडणवीस म्हणाले.

दारिद्र नारायनाची सेवा हीच ईश्वर सेवा, शेवटच्या व्यक्ती सेवा हीच लोकसेवा हा मुलमंत्र गांधीजींनी दिला. त्याच विचारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहे. असं म्हणत फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरवडा सेवा मोहिमेची सांगता केली.

(ठाकरे- शिंदे वादाची ठिणगी गोकुळ दूध संघात, मुरलीधर जाधव यांचे संचालकपद रद्द)

" माझ्या उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या कक्षापेक्षा आज वर्धा येथील उद्घाटन झालेले जिल्हाधिकारी कार्यालयाचे कक्ष सुंदर आहे, असे वाटते की येथे येऊन बसावं" असंही फडणवीस म्हणाले.

आपण आपल्या वाचवल्या वाचवल्या नाही तर पुढच्या पिड्यांना त्या बघता येणार नाही. त्यामुळे "चला नदीला जाणून घेऊया" हा उपक्रम अत्यंत महत्वाची भूमिका राहणार आहे. त्यातून नद्यांचा विकास होईल, समृद्धी येईल, असंही फडणवीस म्हणाले.

First published:

Tags: Marathi news