कोल्हापूर, 02 ऑक्टोंबर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी भाजपसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांना याचा फटका बसत आहे. महाविकास आघाडी काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीला कात्री लावत शिंदे सरकारने शिवसेनेसह दोन्ही धक्का दिला होता. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघात गोकुळमध्ये शिवसेनेच्या मुरलीधर जाधव यांची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. या संदर्भात गोकुळला आदेश प्राप्त झाल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले आहे.
गोकूळच्या शासकीय प्रतिनिधी पदावरून काढून टाकल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी खासदार धैर्यशील माने यांच्यावर टीका केलीय. माने आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घरावर काढलेले मोर्चे जाधव यांना भोवल्याच दिसतंय. त्यामुळे जाधव यांनी या दोघांवर आरोप करत शिवसैनिक खासदार माने यांना माजी खासदार करतील असे म्हणत आपला रोष व्यक्त केलाय. तर शिवसैनिक हे पद गोकूळच्या संचालकापेक्षा मोठे असल्याचे म्हणत राज्यसरकारवरही निशाणा साधलाय.
हे ही वाचा : गुलाबराव पाटलांच्या मनातली खदखद अखेर आली बाहेर, चांगल्या खात्याचा मोह आवरेना
दरम्यान महाविकास आघाडी काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुरलीधर जाधव यांना गोकुळचे संचालक होण्यासाठी मदत केली होती. गोकुळमध्ये शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली होती परंतु गोकुळकडून ठराव संमत न केल्याच्या विरोधात जाधव यांनी गोकुळचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती.
दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वी मुरलीधर जाधव, युवराज पाटील व विजयसिंह मोरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जाधव यांच्या नियुक्तीनंत त्यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांना दहिहंडीच्या उद्घाटनाला बोलावले होते. यामुळे जाधव यांची गोकुळमध्ये जवळीक तयार झाली होती. परंतु शिंदे सरकारने त्यांची नियुक्ती रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसत आहे.
गोकुळकडून सभासदांची दिवाळी जोरात
कोल्हापूर जिल्हा दूध संघ म्हणजे गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी गोकुळ दूध उत्पादकांना फरक देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे दूध उत्पादकांची दिवाळी दणक्यात होणा आहे. यंदा दूध उत्पादकांना 102 कोटी 83 लाखाचा फरक दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
हे ही वाचा : ….‘तेव्हा शिंदे 15 ते 20 आमदारांसह काँग्रेसकडे गेले होते’, शिवसेनेचा गौप्यस्फोट
दरम्यान मागच्या वर्षीपेक्षा यंदा 19 कोटी रुपये इतकी ज्यादा रक्कम मिळणार असल्याची माहिती गोकुळचे नेते, हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी दिली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी माहिती दिली. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघांचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.