Home /News /maharashtra /

सांगलीत 100 किलो सोन्याची तस्करी; जिल्ह्यात NIA कडून अनेक ठिकाणी छापेमारी

सांगलीत 100 किलो सोन्याची तस्करी; जिल्ह्यात NIA कडून अनेक ठिकाणी छापेमारी

Gold Smuggling Sangli: दुबईहून तस्करी करून आणलेलं 100 किलो सोनं सांगलीला पाठवलं असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. यानंतर एनआयएच्या पथकाने सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले ( NIA raids in Sangli) आहेत.

    सांगली, 13 जून: गेल्यावर्षी जुलै महिन्यात दुबईवरून केरळात 100 किलो सोन्याची तस्करी (Gold Smuggling) करण्यात आली होती. याप्रकरणी केरळ कस्टमने कारवाई करत 15 संशयित आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचे धागेदोरे आता सांगली (Sangli) जिल्ह्याशी जोडले गेले आहेत. हे दुबईहून तस्करी करून आणलेलं 100 किलो सोनं सांगलीला पाठवलं असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. यानंतर  एनआयएच्या पथकाने शुक्रवारपासून सांगली जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. तपास सुरू असताना एका आरोपीनं तस्करी केलेलं 100 किलो सोनं सांगली जिल्ह्यात पाठवल्याची कबुली दिली आहे. यानंतर एनआयएच्या पथकाने सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले ( NIA raids in Sangli) आहेत.  शनिवारी एनआयएच्या पथकानं सांगली जिल्ह्यातील खानापूर, कवठेमहांकाळ, आटपाडी आणि तासगाव याठिकाणी छापे टाकले आहे. या छाप्यांबाबत एनआयएनं कमालीची गुप्तता बाळगली आहे. 9 जून रोजी एनआयएच्या पथकाकडून सोने तस्करीचा मुख्य सूत्रधार मोहम्मद मन्सूरला अटक केली आहे. गेल्यावर्षी दिल्ली येथील एका रेल्वे स्टेशनवर सोने तस्करीची एक मोठी घटना उघडकीस आली होती. याचं कनेक्शन थेट सांगलीशी जोडलं गेलं होतं. यानंतर आरोपींच्या माहितीच्या आधारावर एनआयएने सांगलीत पहिल्यांदा छापे टाकले होते. या पथकाकडून जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. हे दुबईतून केरळला आणि केरळातून सांगलीला आणलं गेल्याचा संशय पोलिसांना होता. यानंतर पुन्हा एकदा सांगली कनेक्शन समोर आल्यानं एनआयएचे पथक दुसऱ्यांदा सांगली जिल्ह्यात दाखल झाले. हे ही वाचा-पोलिसांच्या VIDEO चाच वापर करून सायबर गुन्हेगारांनी केली 80 लाखांची फसवणूक याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींकडून पोलिसांना अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळत आहे. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशयही पोलिसांना आहे. आरोपींच्या चौकशीत आणखी काय काय उघड होणार? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Gold, Sangli, Smuggling

    पुढील बातम्या