जाहिरात
मराठी बातम्या / देश / पोलिसांच्या VIDEO चाच वापर करून सायबर गुन्हेगारांनी केली 80 लाखांची फसवणूक

पोलिसांच्या VIDEO चाच वापर करून सायबर गुन्हेगारांनी केली 80 लाखांची फसवणूक

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

रिमोट कंट्रोल app मालवेअर अ‍ॅप नसतात, परंतु याचा चुकीचा वापर झाल्यास, या अ‍ॅपद्वारे चुकीच्या व्यक्तीकडे फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यास ते अतिशय धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे युजरला मोठं नुकसान होऊ शकतं.

सोशल मीडियाचा वापर करुन जनतेचं प्रबोधन करण्यासाठी केलेला प्रयोग सायबर गुन्हेगारांमुळे (Cyber Criminal) खुद्द पोलिसांनाच (Police) महागात पडला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रांची, (झारखंड) 13 जून : सोशल मीडियाचा (Social Media) वापर संवाद आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्याकरिता केला जातो. तसेच याचा वापर प्रबोधन, जनजागृतीसाठीदेखील केला जातो. आज अनेक शासकीय कार्यालये शासनाच्या विविध योजना, निर्णय आदींची माहिती या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवतात. तसेच अनेक बाबींविषयी जनजागृती देखील शासनाच्या माध्यमातून सोशल मीडियाव्दारे केली जाते. परंतु, सोशल मीडियाचा वापर करुन जनतेचं प्रबोधन करण्यासाठी केलेला प्रयोग सायबर गुन्हेगारांमुळे (Cyber Criminal) खुद्द पोलिसांनाच (Police) महागात पडला आहे. तोतया पोलिस, कॉलगर्ल आणि युट्युबरने एकत्र येत सध्या सायबर क्राईमला नवे रुप दिले आहे. यात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोटो किंवा व्हिडीओ वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच काहीसा गुन्हा नुकताच राजस्थानमध्ये (Rajasthan) उघडकीस आला. त्यानंतर झारखंड सीआयडी (CID) (सायबर सेल) शाखेने असे गुन्हे टाळण्यासाठी लोकांचे प्रबोधन करण्याकरिता युट्युब चॅनेल (Youtube Channel) सुरु केले, मात्र याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी सरसावले आणि त्यांनी 80 लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. हे ही वाचा: धक्कादायक! Facebook वरून हेरली जात आहेत देहविक्रयासाठी मुलं CID च्या सायबर सेलचे डीएसपी सुमित कुमार यांनी सायबर सुरक्षा (Cyber Security) या नावाने एक YouTube चॅनेल सुरू केले होते. याचा वापर सायबर गुन्हेगारांपासून लोकांनी सुरक्षित कसे राहावे, यासाठी केला जात होता. परंतु, पोलिसांनी उचलेल्या या पावलाचा फायदा सायबर गुन्हेगारांनीच घेतला आणि सुमारे 80 लाखांची फसवणूक केली. या प्रकाराची माहिती मिळताच सीआयडीच्या सायबर सेलच्या डीएसपींनी ही बाब राजस्थान सायबर सेलच्या निर्दशनास आणून दिली. त्यानंतर राजस्थानमधील अरवल येथून 11 सायबर गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली. या प्रकाराची माहिती देताना डीएसपींनी सांगितले, की ही टोळी व्हॉटसअपवर न्यूड मुलींचे फोटो पाठवून लोकांना आपल्या जाळ्यात ओढत असे. सेक्सटॉर्शनच्या (Sextortion) माध्यमातून ही फसवणूक केली जात असे. खरंतर लोकांची फसवणूक होऊ नये यासाठी रांचीचे सायबर डीएसपी सुमित कुमार यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केला. पण याच व्हिडीओचा वापर हुशार सायबर गुन्हेगारांनी केला आणि त्यामाध्यमातून ब्लॅकमेलिंग सुरु केले. डीएसपींचा हा व्हिडीओ दाखवून न्यूड व्हिडीओ फ्रॉड केला जात होता. हा व्हिडीओ एडीट (Edit) करुन त्यात सायबर गुन्हेगार आपला आवाज समाविष्ट करत होते. त्यामुळे लोक अलगदपणे त्यांच्या जाळ्यात अडकत असत. डीएसपींनी सांगितले की या व्यतिरिक्त अजूनही अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोटो आणि व्हिडीओचा वापर करुन सायबर फ्रॉडचे (Cyber Fraud) प्रकार घडवून आणले गेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात