मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Amravati Violence: अमरावती हिंसाचारानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Amravati Violence: अमरावती हिंसाचारानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Amravati Violence: अमरावतीत सद्यपरिस्थिती नेमकी कशी आहे याबाबत गृहमंत्र्यांनी अपडेट केलं आहे.

Amravati Violence: अमरावतीत सद्यपरिस्थिती नेमकी कशी आहे याबाबत गृहमंत्र्यांनी अपडेट केलं आहे.

Amravati Violence: अमरावतीत सद्यपरिस्थिती नेमकी कशी आहे याबाबत गृहमंत्र्यांनी अपडेट केलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

अमरावती, 14 नोव्हेंबर: शनिवारी अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागलं. त्यानंतर अमरावतीत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर शनिवारपासून संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली. अमरावतीत झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अमरावतीत सद्यपरिस्थिती नेमकी कशी आहे याबाबत गृहमंत्र्यांनी अपडेट केलं आहे.

अमरावतीतील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच हिंसाचारात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरवर युवराजचा निशाणा, विराट-अनुष्काचं Meme Share करत लगावला टोला

अमरावतीत तोडफोड- दगडफेक

त्रिपुरात (Tripura) घडलेल्या अत्याचाराच्या प्रकारानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. शुक्रवारी राज्यातील विविध भागांत निषेध मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर शनिवारी अमरावती बंदची (Amravati bandh) हाक देण्यात आली होती. अमरावती शहर बंदला हिंसक वळण (violence during Amravati bandh) लागलं.

शनिवारी जमावाकडून दुकानांवर दगडफेक (stone pelting) आणि तोडफोड करण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. वैद्यकीय कारणाशिवाय कोणालाही घराबाहेर न पडण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आलेत.

हेही वाचा- IND vs NZ: राहुल द्रविड लागला कामाला, पहिल्याच दिवशी केलेली कृती वाचून वाटेल अभिमान 

त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता, मात्र या मोर्चाला गालबोट लागलं होतं. या मोर्चाला हिंसक वळण आलं तर गाड्या आणि 20 ते 25 दुकानाची तोडफोड करण्यात आली होती. याचाच निषेध म्हणून शनिवारी अमरावती शहर बंदचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले होते.

तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित

हिंसाचाराला चिथावणी देणार्‍या अफवा पसरू नयेत म्हणून इंटरनेट सेवा तीन दिवस बंद ठेवली जाईल, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितलं. अमरावतीत बंद दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनानंतर शनिवारपासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर पुढचे तीन दिवस इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे. शहर पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

First published:

Tags: Amravati