परभणीत महिलेनं दिला माश्यासारख्या बाळाला जन्म,पण...

परभणीत महिलेनं दिला माश्यासारख्या बाळाला जन्म,पण...

अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळाला वैद्यकीय परीभाषेत सीरोनोमेलिया (मत्सपरी) असं म्हणतात.

  • Share this:

 

पंकज क्षीरसागर, परभणी, 19 आॅगस्ट : परभणीच्या जिल्हा रुग्णालयात पाण्यातील माश्या सारखा दिसणाऱ्या बालकाला एका मातेने जन्म दिला आहे. शनिवारी दुपारी 12 वाजता शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या बाळाला सुखरूप जगात आणले, मात्र काही तासातच त्याचा मृत्यू झाला.

या बाळाला जन्म देणाऱ्या महिलेचे सविता बोचरे असं नाव असून ती मानवत तालुक्यातील पिंपरा या गावाची रहिवासी आहे. तिच्या पोटात कळ येत असल्याने घरच्यांनी तिला प्रथम सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथून तिला परभणीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.  या महिलेनं एका अनोख्या बाळाला जन्म दिला. ज्याचे दोन्ही पाय हे एकत्रित होते मात्र दुर्दैवाने या बाळाचा 4 तासातच मृत्यू झाला. मानवत तालुक्यातील पिंपळा येथील दाम्पत्याला पहिली मुलगी आणि दुसरे हे बाळ आज जन्माला आले मात्र जन्म झाल्या नंतर या बाळाच्या पालकांसह डॉक्टर ही चकित झाले ते या बाळाचे दोन्ही पाय एकत्रित पाहून जे की खूप कमी केसेसमध्ये होते काही जण याला जलपरी असल्याचं सांगत होते.

दरम्यान, 'अशी केस लाखात एखादी असते. याला (Sirenomelia) वैकल्पिकरित्या मरमेड सिंड्रोम म्हणून ओळखले जाते, ही एक दुर्मिळ जन्मजात विकृती आहे. ज्यामध्ये पाय एकत्र केले जातात. त्यांना एक मत्स्यालयाची शेपूट दिसू लागते, अशी माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. कालिदास चौधरी यांनी दिली.

तसंच बाळाच्या आईने गरोदरपणातील नऊ महिने एकदाही सोनोग्राफी केलेली नाही, ज्यामुळं हा प्रकार लक्ष्यात आलेला नव्हता. ही महिला थेट आज, शनिवारी दुपारी 12 वाजता रुग्णालयात दाखल झाली होती. तिची तपासणी केली असता, आम्ही परिस्थिती पाहून तात्काळ शस्त्रक्रिया (सिजर) करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर असे बाळ जन्माला आल्याचे दिसून आले मात्र जन्मल्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉ. चौधरी यांनी सांगितलं.

याआधी 21 मे 2018 रोजी बीडमध्येही अशाच एका बाळाचा जन्म झाला होता. अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात एका महिलेने या बाळाला जन्म दिला होता. ह्या बाळाची प्रसुती होत असतात ना या बाळास पाय नसल्याचं लक्षात आलं त्यावरून एक लाखात एक अशी प्रसुती होत असल्याचं डाॅ. बनसोडे यांनी सांगितलं.   प्रसुतीनंतर बाळाची तपासणी केली असता बाळास दोन पायाऐवजी दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेले शरीर आढळून आले. सदरील महिलेची प्रसुती ही अत्यंत नाॅर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघे १५ मिनिटांचे आयुष्य मिळाले.

अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळाला वैद्यकीय परीभाषेत सीरोनोमेलिया (मत्सपरी) असं म्हणतात. सोनोग्राफीची सोय असताना ग्रामीण भागातील गरोदर माता याचा लाभ घेत नसल्याने अशा प्रकारच बाळ जन्माला येते असल्याच्या घटना समोर येत आहे.

INDvsEND: गुरुद्वारात झोपायचा तर लंगरमध्ये जेवायचा हा खेळाडू, आता विराटने दिली मोठी संधी

First published: August 19, 2018, 11:35 AM IST

ताज्या बातम्या