मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Parbhani Farmer : 'साहेब शेती परवडत नाही,  हेलीकॉप्टर खरेदीसाठी कर्ज द्या!' शेतकऱ्यांने थेट बँकेत केलेल्या अजब मागणीने अधिकारीही चक्रावले

Parbhani Farmer : 'साहेब शेती परवडत नाही,  हेलीकॉप्टर खरेदीसाठी कर्ज द्या!' शेतकऱ्यांने थेट बँकेत केलेल्या अजब मागणीने अधिकारीही चक्रावले

बोरी गावचे शेतकरी दगडूबा देवराव वजीर यांनी आपली शेती तारण ठेवून चॉपर घेण्यासाठी 6 कोटींचं कर्ज मागितलं आहे. बँकेने त्यांचा अर्ज स्वीकारला आहे, पण त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

बोरी गावचे शेतकरी दगडूबा देवराव वजीर यांनी आपली शेती तारण ठेवून चॉपर घेण्यासाठी 6 कोटींचं कर्ज मागितलं आहे. बँकेने त्यांचा अर्ज स्वीकारला आहे, पण त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

बोरी गावचे शेतकरी दगडूबा देवराव वजीर यांनी आपली शेती तारण ठेवून चॉपर घेण्यासाठी 6 कोटींचं कर्ज मागितलं आहे. बँकेने त्यांचा अर्ज स्वीकारला आहे, पण त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

मुंबई, 07 जुलै : साहेब, मागच्या कित्येक वर्षांपासून शेती (farming) करतो माझ्या शेतीतून सरकारला फायदा झाला पण मला साधं जगता ही येत नाही. शेतीसाठी लागणारे कर्ज (farming crop loan) मिळवण्यासाठी कागदपत्रे जुळवताना आमची दमछाक होते. जमीन गहाण ठेवूनही आम्हाला कर्जासाठी (crop loan) कोणी दारात उभे करत नाही. आता दोन एकर शेतीमध्ये उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर (helicopter) खरेदी करून भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करत असल्याने मला कर्ज द्यावे, अशी मागणी परभणी जिल्ह्यातील (parbhani) बोरी गावच्या एका शेतकऱ्यांने बँकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. (bank officer) त्यांच्या या मागणीमुळे बँकेचे अधिकारी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

परभणी जिल्ह्यातील बोरी गावचे शेतकरी दगडूबा देवराव वजीर यांची दोन एकर शेती आहे. वजीर यांच्याशी news18 लोकमतने संपर्क साधला यावेळी ते म्हणाले, 1972 साली दुष्काळामध्ये माझे वडील वारले त्यावेळी मी अवघ्या 9 वर्षांचा होतो त्यावेळीपासून मी शेती करतो. मागच्या 50 वर्षांत मी अल्पभुदारक असुनही काबाड कष्ट करून चांगल्या पद्धतीने शेती करत विक्रमी उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. सोयाबीन, ज्वारी, कापूस, तुरी, यासारख्या पिकांमधून मी भरघोस उत्पादन घेतले परंतु अलिकडच्या काळात सरकारच्या शेतीविषयक धोरणांमुळे शेती परवड नसल्याचे त्यांनी सांगितले.

1972 ते 2019 या काळात मी शेतीच्या माध्यमातून सरकारला 6 कोटी 67 लाखांच्या आसपास धान्य उपलब्ध करून दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भातही पावसाचा हाहाकार, ढगफुटीमुळे तालुकाच पाण्याखाली

आमच्या जगण्यापुरते धान्य घरी ठेवून आम्ही सगळे धान्य सरकारला देत असतो त्याचा हिशोब आम्ही केला यातून सरकारला आतापर्यंत आमचे 6 कोटी 67 लाखांच्या आसपास धान्य दिल्याचे लक्षात आले आहे. सध्या शेती परवडत नाही. सरकारची धोरणे आणि बियाणांचे आणि खतांचे वाढते दर याचबरोबर अस्मानी संकटे, कोरोनाकाळात मागे पडलेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळणे कठीण असल्याने टोकाचे पाऊल शेतकरी उचलत असल्याचे वजीर म्हणाले.

मागील काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. त्यातच पीक कर्ज देण्यासाठी बँकांचे अनेक कागदपत्रांचे अडथळे पार करावे लागतात. नाहरकत प्रमाणपत्र, सातबारावर बोजा टाकावा लागतो. मात्र, शेती गहाण ठेवूनही पीक कर्ज मिळत नाही. पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात. तथापि, दोन एकर शेती विकूनही हेलिकॉप्टर खरेदी करता येत नाही. म्हणून मी मागच्या 50 वर्षात सरकारला धान्याच्या रुपात केलेल्या मदतीचे तारण ठेवून मला भाड्याने हेलिकॉप्टर द्यावे यासाठी भारतीय स्टेट बँकेत अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

हे ही वाचा : 'ते' खपवून घेतलं जाणार नाही; सत्तांतरानंतरच्या पहिल्याच सभेत रोहित पवारांचा राम शिंदेंना इशारा

सध्या शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे. मोठे उद्योगपती हेलिकॉप्टर भाड्याने देऊन चांगले उत्पन्न मिळवतात. त्यामुळे हेलिकॉप्टर भाड्याने देण्याचा व्यवसाय निवडला असून त्यासाठी बँकेकडे कर्जाची मागणी केल्याचे दगडुबा वजीर यांनी http://news 18 lokmat ला सांगितले.

वजीर पत्रात म्हणाले की

वरिल विषयास अनुसरुन मी अर्ज सादर करतो की, मी दगडूबा देवराव वजीर रा. बोरी ता. जितुर जिल्हा परभणी येथील अल्पभूधारक शेतकरी असून, मला हेलिकॉप्टर खरेदीसाठी बँकेकडून कर्जाची आवश्यकता आहे.

निसर्गाच्या लहरीमुळे शेतीमधून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. तसेच सुलतानी संकटात उत्पादन हाती पडत नाही, काबाड कष्ट करून शेतकरी नेहमीच अडचणीचा सामना करून पुढील हंगामासाठी आशावादी असतात तरीही अस्मानी सुलतानी चे दुष्टचक्र संपत नाही त्यामुळे शेतीला पर्याय म्हणून दुसरा व्यवसाय सुरू करण्यासाठी मला हेलिकॉप्टर खरेदीसाठी बँकेकडून कर्जाची आवश्यकता आहे.

तरी मला शाखेकडून 6 कोटी 67 लाख रुपये कर्जाची आवश्यकता आहे. हेलिकॉप्टरसाठी व्यवसाय तासाला 65 हजार रुपये भाडे मिळते त्यामुळे हा विचार केला आहे. तरी मला मा. साहेबानी कर्ज देउन उपक्रत करावे हि विनंती. अशा आशयाचे पत्र लिहल्याचे वजीर म्हणाले.

First published:
top videos

    Tags: Bank services, Farmer, Farmer protest, Parbhani, Parbhani news, Protesting farmers