मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Sindhudurg District bank election result: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने मारली बाजी, सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर भाजपचं वर्चस्व

Sindhudurg District bank election result: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने मारली बाजी, सर्वाधिक जागा जिंकत बँकेवर भाजपचं वर्चस्व

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकाल

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकाल

Sindhudurg bank election updates: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत एकूण 98.67 टक्के मतदान झाले.

  • Published by:  Sunil Desale

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीदरम्यान (Sindhudurg District Central Cooperative Bank Election) जिल्ह्यात राजकीय धुमशान पहायला मिळालं. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून या निवडणुकीत राणेंनी आपला गड राखला आहे. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजप पुरस्कृत सिद्धीविनायक पॅनलने जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं आहे. सिद्धीविनायक पॅनलने 19 पैकी 11 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

सिद्धीविनायक सहकार पॅनल X सहकार समृद्धी पॅनल

भाजप X महाविकास आघाडी

1 राजन कृष्णा तेली 63 मते X सुशांत श्रीधर नाईक 78 मते (विजयी)

2 अतुल सुधाकर काळसेकर 44 मते (विजयी) X सुरेश यशवंत दळवी 26 मते

3 गजानन सुमंत गावडे 110 मते (विजयी) X लक्ष्मण आनंद आंगणे 85 मते

4 महेश रमेश सारंग 33 मते (विजयी) X मधुसुदन केशव गावडे 27 मते

5 संदिप उर्फ बाबा मधुकर परब 68 मते (विजयी) X विनोद रामचंद्र मर्गज 54 मते

6 समीर रमाकांत सावंत 110 मते (विजयी) X विकास भालचंद्र सावंत 85 मते

7 मनीष प्रकाश दळवी 13 मते (विजयी) X विलास प्रभाकर गावडे 8 मते

8 गुरूनाथ शंकर पेडणेकर 16 मते X विद्याधर रविंद्रनाथ परब 17 मते (विजयी)

9 प्रकाश सखाराम गवस 5 मते X गणपत दत्ताराम देसाई 7 मते (विजयी)

10 विठ्ठल दत्ताराम देसाई (विजयी) X सतीश जगन्नाथ सावंत

11 प्रकाश जगन्नाथ मोर्ये 15 मते X विद्याप्रसाद दयानंद बांदेकर 20 मते (विजयी)

12 प्रकाश विष्णू बोडस 19 मते (विजयी ) X अविनाश मनोहर माणगांवकर 17 मते

13 कमलाकांत उर्फ बाळू धर्माजी कुबल 11 मते X व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस 19 मते (विजयी)

14 दिलीप मोहन रावराणे 11 मते (विजयी) X दिगंबर श्रीधर पाटील 9 मते

15 अस्मिता दत्तात्रय बांदेकर 459 मते (विजयी) X अनारोजीन जॉन लोबो 457 मते

16 प्रज्ञा प्रदिप ठवण 480 मते X निता रणजितसिंग राणे 503 मते (विजयी)

17 सुरेश ज्ञानदेव चौकेकर 458 मते X आत्माराम सोमा ओटवणेकर 506 मते (विजयी)

18 रविंद्र मनोहर मडगांवकर 487 मते (विजयी) X मनिष मधुकर पारकर 484 मते

19 गुलाबराव शांताराम चव्हाण 451 मते X मेघनाद गणपत धुरी 517 मते (विजयी)

सिद्धीविनायक पॅनेल भाजपा विजयी

1. मनीष दळवी - वेंगुर्ला

2. दिलीप रावराणे - वैभववाडी

3. प्रकाश गोडस - देवगड

4. विठ्ठल देसाई - कणकवली

5. अतुल काळशेकर : पणन विभाग

6. महेश सारंग : दुग्ध विभाग

7. संदीप परब

8. समीर सावंत : वैयक्तिक मतदार संघ

9. गजानन गावडे : मजूर विभाग

10. प्रज्ञा ढवन : महिला विभाग

11. अस्मिता बांदेकर : महिल विभाग

(विठ्ठल देसाई आणि सतिश सावंत यांच्यात टाई झाली होती. अखेर विठ्ठल देसाई यांचा विजयी झाला)

महाविकास आघाडी

1. व्हिक्टर डॅाटस : मालवण

2.विद्याप्रसाद बांदेकर : कुडाळ

3.विद्याधर परब : सावंतवाडी

4.गणपत देसाई : दोडामार्ग

5. सुशांत नाईक : कणकवली

या प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीत पुन्हा एकदा आजवरचा इतिहास पाहायला मिळाला, काही मतदार गायब असल्याचे प्रकर्षाने जाणवले. तर जिल्हा बँकेतील उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) हे संतोष परब यांच्या हल्ल्यातील कटात सामील असल्याच्या आरोपात संशयित असल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले. न्यायलायाकडे मतदानासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावनी करताना न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम जमीन अर्ज न्यायालायने फेटाळला. (Sindhudurg District bank election updates)

किती टक्के झाले मतदान ?

या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67 % मतदान झाले असून तालुकानिहाय कुडाळ- 213 पैकी 213 - 100 % , वेंगुर्ले - 96 पैकी 91 - 94.79 %, सावंतवाडी - 212 पैकी 211 - 99.52 %, वैभववाडी 54 पैकी 13 - 98 %, कणकवली - 165 पैकी 161 - 97.57 %, मालवण - 110 पैकी 110 - 100 % दोडामार्ग - 48 पैकी 48 - 100 %, देवगड - 98 % मतदान झाले.

वाचा : Sindhudurg District bank Election: भाजपला दुसरा धक्का

बहुमताचा आकडा कोण गाठणार?

ही निवडणूक राणे आणि शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली. काल सकाळी 7 वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया 4 वाजता संपली. सकाळी 9 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालायत मतमोजणीला सुरुवात झाली असून आता निकाल समोर आले आहेत.

याआधी कुठल्या पक्षाची सत्ता किती जागा कुणाकडे?

2008 पासून बँक राणेंच्या अधिपत्याखाली आहे. एकूण 19 जागांसाठी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या.

वाचा : हायकोर्टात धाव घेतली तरी नितेश राणेंपुढे मोठी अडचण, जेलवारी अटळ?

सध्या कुठले पँनल निवडणुकीच्या रिंगणात?

महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत.

एकूण किती जागासाठी निवडणूक?

एकूण 19 जागांसाठी निवडणूक

एकूण 39 उमेदवार रिंगणात

First published:

Tags: Narayan rane, Nitesh rane, Shiv sena, Sindhudurg