मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Sindhudurg District bank Election: भाजपला दुसरा धक्का, उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Sindhudurg District bank Election: भाजपला दुसरा धक्का, उमेदवार मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

भारतीय जनता पक्षाला दिवसभरात आता दुसरा मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमुळे राजकीय धुमशान सुरू असतानाच भाजपला एकामागे एक धक्के बसत आहेत.

भारतीय जनता पक्षाला दिवसभरात आता दुसरा मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमुळे राजकीय धुमशान सुरू असतानाच भाजपला एकामागे एक धक्के बसत आहेत.

भारतीय जनता पक्षाला दिवसभरात आता दुसरा मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमुळे राजकीय धुमशान सुरू असतानाच भाजपला एकामागे एक धक्के बसत आहेत.

तुषार रुपनवर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी (Sindhudurg District Central Co operative Bank Election) मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपला (BJP) एकामागे एक असे धक्के बसत आहेत. सहकार विभागाने आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना मतदानाचा हक्क बजावण्यास नाकारला असतानाच आता भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

न्यायलयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यामुळे मनीष दळवी हे मतदानापासून वंचित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कटात सहभाग असल्याचे समजताच मनीष दळवी यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अंतरिम जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने तो अर्ज फेटाळला आहे.

काल झालेल्या सुनावणीमध्ये सरकारी वकील यांनी नितेश राणेंचे पीए राकेश परब आणि उमेदवार मनीष दळवी यांचा देखील संतोष परब मारहाण प्रकरणात उल्लेख केला होता. त्यानंतर आज न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवीचा जामीन अर्ज फेटाळला.

नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

आमदार नितेश राणे ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे सहकार विभागाने आमदार नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. आमदार नितेश राणेंचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.

या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांचे नाव संतोष परब मारहाण प्रकरणात आल्यामुळे मनीष दळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला होता. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 4 पर्यंत 39 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात नेमका जिल्हा बँकेवर कोण बाजी मारत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

वाचा : सिंधुदुर्गात धुमशान; जिल्हा बँकेसाठी मतदान तर नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार

कुठले पँनल निवडणुकीच्या रिंगणात?

महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत.

एकूण किती जागांसाठी निवडणूक?

एकूण 19 जागांसाठी निवडणूक

एकूण 39 उमेदवार रिंगणात

First published:
top videos

    Tags: BJP, Sindhudurg