मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nitesh rane : हायकोर्टात धाव घेतली तरी नितेश राणेंपुढे मोठी अडचण, जेलवारी अटळ?

Nitesh rane : हायकोर्टात धाव घेतली तरी नितेश राणेंपुढे मोठी अडचण, जेलवारी अटळ?

'उद्या कॉपी मिळाल्यानंतर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल. त्यानंतर शनिवार आणि रविवार आला आहे, त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे'

'उद्या कॉपी मिळाल्यानंतर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल. त्यानंतर शनिवार आणि रविवार आला आहे, त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे'

'उद्या कॉपी मिळाल्यानंतर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल. त्यानंतर शनिवार आणि रविवार आला आहे, त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे'

मुंबई, 30 डिसेंबर :  सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurg District Cooperative Bank Election) शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane bail reject) यांचा अटकपूर्वी जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असला तरी ते हायकोर्टात धाव घेणार आहे. पण हायकोर्टात जरी धाव घेतली तरी राणेंची जेलवारी ही अटळ आहे.

शिवसेना कार्यकर्ता संतोष परब हल्ला प्रकरणी अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यांच्या जामीन अर्जावर गेल्या दोन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. अखेरीस आज त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यापुढे हायकोर्टात जाणार आहे.

'जिल्हा सत्र न्यायालयातून आम्हाला ऑर्डर कॉपी मिळणार आहे. ती अद्याप मिळाली नाही. उद्या सकाळी ही पत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर आम्ही हायकोर्टात याचिका दाखल करू. पण, अजून कॉपी मिळाली नाही, अशी माहिती नितेश राणे यांचे वकिल संग्राम देसाई यांनी सांगितलं.

(शिल्पा शिरोडकरला कोरोनाची लागण ; पोस्ट शेअर करत दिली माहिती)

उद्या शुक्रवार आला आहे, उद्या कॉपी मिळाल्यानंतर हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल. त्यानंतर शनिवार आणि रविवार आला आहे, त्यामुळे दोन दिवस सुट्टी आहे. सोमवारी कामाचा दिवस आहे, त्यादिवशी सुनावणी होऊ शकेल किंवा मंगळवारी सुद्धा सुनावणी होऊ शकते, असंही देसाई यांनी सांगितलं.

राजकीय दबाव नव्हता आणि अजूनही नाही. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केल्यानंतर मीच खटला लढवणार हे सुद्धा ठरले नाही. नारायण राणे यांनी अद्याप भेटायला बोलावले नाही, असंही देसाई यांनी सांगितलं.

त्यामुळे नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली असून नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नितेश राणे यांचा शोध घेण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस शोध घेत आहे. जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. नितेश राणे यांना हायकोर्टात धाव घेण्याची मुभा जरी असली तरी त्यांना आधी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार आहे.

(येडा की खुळा? 14 वेळा घेतली कोरोनाची लस, केवळ 4 हजारांसाठी जिवाशी खेळ)

कोर्टाची दोन्ही पक्षाकारांची बाजू पडताळता चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने दोघांचेही अटक पूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. पोलीस तपासात सहकार्य न करणे तसेच इतर काही तांत्रिक बाबींचा विचार करता न्यायालायने दोघांचेही जामीन अर्ज फेटाळले. या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांच्या युक्तिवादाला यश आले. या निर्णयानंतर आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना कधीही अटक होऊ शकते.

अटक वाचविण्यासाठी पोलीस कारवाई थांबविण्यासाठी  दोघांनाही अटक पूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. जिल्हा सत्र न्यायालयाचा  निकाल उशिरा जाहीर झाल्यामुळे आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना उद्या सकाळ पर्यंतची पहावी लागणार वाट आहे. या निर्णयामुळे  जिल्ह्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून चौका चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

First published: