मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सिंधुदुर्गात राजकीय धुमशान; आज जिल्हा बँकेची निवडणूक तर नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम

सिंधुदुर्गात राजकीय धुमशान; आज जिल्हा बँकेची निवडणूक तर नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम

Sindhudurg district central co operative bank election: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Sindhudurg district central co operative bank election: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Sindhudurg district central co operative bank election: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची आज निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

  • Published by:  Sunil Desale

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सिंधुदुर्ग शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी (Shiv Sena workers attack case) भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane)अडचणीत सापडले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत असणाऱ्या जिल्हा बँकेची निवडणूक आज होणार आहे. राज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील तसेच आमदार वैभव नाईक यांच्यासह 930 सभासद आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर 19 जागांसाठी 39 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांचे नाव संतोष परब मारहाण प्रकरणात आल्यामुळे मनीष दळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र निकाल प्रलंबित असल्याने आज प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मनीष दळवी आपला मतदानाचा हक्क आहे तो कसा बजावतात हे महत्वाचे ठरणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 4 पर्यंत 39 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात नेमका जिल्हा बँकेवर कोण बाजी मारत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

याआधी कुठल्या पक्षाची सत्ता किती जागा कुणाकडे?

2008 पासून बँक राणेंच्या अधिपत्याखाली आहे. एकूण 19 जागांसाठी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या.

वाचा : नितेश राणेंच्या सचिवांना कोणत्याही क्षणी अटक, राणे समर्थक उमेदवारालाही बेड्या?

सध्या कुठले पँनल निवडणुकीच्या रिंगणात?

महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत.

एकूण किती जागासाठी निवडणूक?

एकूण 19 जागांसाठी निवडणूक

एकूण 39 उमेदवार रिंगणात

निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा पणाला ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा लागली आहे.

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणात अटक टाळण्यासाठी नितेश राणेंनी कोर्टात धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. कालही (29 डिसेंबर) न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही वकिलांनी बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

सरकारी वकील आणि संग्राम देसाई यांच्या खडाजंगी

दरम्यान, नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान सरकारी वकील आणि नितेश राणेंच्या वकीलांत जोरदार खडाजंगी झाली. सरकारी वकील जाणूनबुजून वेळ काढत आहेत, असं म्हणत नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलं. तर सरकारी वकील घरत यांनी याबात आक्षेप घेतला. त्यामुळे नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकिल यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली.

पोलीस तपास पूर्णत एकतर्फी पद्धतीने सुरू आहे.राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्हयात येऊन बसले आहेत.

त्यांची या जिल्ह्यात याची काय भूमिका आहे? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. तर, राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित आहेतर तर देशाचे केंद्रीय मंत्री या जिल्ह्यात काय करत आहे असा सवाल सरकारी वकील घरत यांनी उपस्थित केला.

दरम्यान, या प्रकरणात सात मोबाईल पोलिसांना जप्त करण्याची परवानगी द्यावी, त्याच सोबत नितेश राणे तपासात अजिबात सहकार्य करत नाहीत. वरील सर्व गोष्टींचा विचार करता आरोपींचा जामीन फेटाळावा, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली.

First published:

Tags: BJP, Nitesh rane, Shiv sena, Sindhudurg