मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

BREAKING : नितेश राणेंच्या सचिवांना कोणत्याही क्षणी अटक, राणे समर्थक उमेदवारालाही बेड्या?

BREAKING : नितेश राणेंच्या सचिवांना कोणत्याही क्षणी अटक, राणे समर्थक उमेदवारालाही बेड्या?

पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदूर्ग पोलीस कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे,

पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदूर्ग पोलीस कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे,

पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदूर्ग पोलीस कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे,

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 29 डिसेंबर : शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे पुरते अडचणीत सापडले आहे. वडील नारायण राणे (narayan rane) यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तर दुसरीकडे, नितेश राणे (nitesh rane) यांची सचिव आणि राणे समर्थक पॅनलच्या उमेदवाराला कोणत्याही क्षण अटक होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजप आमदार नितेश राणे यांचे पीए राकेश परब आणि राणे समर्थक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांना सिंधुदूर्ग पोलीस कोणत्याही क्षणी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे, नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी सुरू आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

दरम्यान,नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांना पोलीस स्टेशनला हजर राहण्यास या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे नॉट रिचेबल असताना आता पोलिसांनी नारायण राणे यांना कणकवली पोलिसांकडून नोटीस आली आहे. या नोटीसीवरून भाजपच्या नेत्यांनी वाद निर्माण केला आहे.

'या प्रकरणात सत्तेचा दुरुपयोग चालू आहे. नितेश राणे यांना अटक केल्यास जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयावर मोर्चा काढू पोलिसांची दडपशाई आहे, असे इशारे नारायण राणे यांनी दिले. मग पोलिसांनी कारवाई केली तर त्यांची चूक काय आहे, असा मुद्दा अॅड. प्रदीप घरात यांनी  न्यायालयासमोर मांडला.

(सलमान खानला 'या' सेलिब्रेटींकडून मिळाल्या महागड्या भेटवस्तू; पाहा LIST)

तसंच, जर, आम्ही जे पुरावे सादर केले आरोपींच्या लिंक मिळतात, कॉल डिटेल्स मिळालं यावरून सहभाग निष्पन्न होत नाही का? आमचे तांत्रिक मुद्दे आरोपीच्या वकिलांनी खोदून दाखवावे. फक्त संतोष परब यांच्यावर हल्ला करून निवडणुकीचे राजकारण करतात हे योग्य नाही, हा आरोप योग्य नाही, असा युक्तीवादही घरत यांनी केला.

दरम्यान, नारायण राणे काल पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नितेश राणे कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे का? असं विधान त्यांनी केलं होतं.  एक केंद्रीय मंत्री आहात आणि एवढे हायपर का होतात? महाराष्ट्र पोलीस जर त्यांचे असतील तर केंद्रात आमची सत्ता आहे. मग मुलांना वाचवण्यासाठी ही पोलिसांना धमकी नाही का? असा सवालही  सरकारी वकिलांनी कोर्टात उपस्थितीत केला.

First published: