Home /News /maharashtra /

BREAKING : नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम, कोर्ट उद्या देणार निकाल

BREAKING : नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम, कोर्ट उद्या देणार निकाल

 तर दुसरीकडे, नितेश राणे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

तर दुसरीकडे, नितेश राणे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

तर दुसरीकडे, नितेश राणे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे.

    सिंधुदुर्ग, 29 डिसेंबर : शिवसेनेच्या कार्यकर्त्यावर हल्ला प्रकरणी (Shiv Sena workers attack case) भाजपचे आमदार नितेश राणे (nitesh rane)अडचणीत सापडले आहे. आज दुसऱ्या दिवशीही अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली असून निर्णय हा उद्या देण्यात येणार आहे. तर दुसरीकडे, नितेश राणे यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली आहे. सिंधुदुर्ग बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अटक टाळण्यासाठी नितेश राणेंनी कोर्टात धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे. आजही न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही वकिलांनी बाजू ऐकून घेतल्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी उद्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारी वकील आणि संग्राम देसाई यांच्या खडाजंगी दरम्यान, सरकारी वकील जाणूनबुजून वेळ काढत आहेत, असं म्हणत नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलं. तर सरकारी वकील घरत यांनी याबात आक्षेप घेतला. त्यामुळे नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई आणि सरकारी वकिल यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. पोलीस तपास पूर्णत एकतर्फी पद्धतीने सुरू आहे.राज्याचे पोलीस महासंचालक या जिल्हयात येऊन बसले आहेत. त्यांची या जिल्ह्यात याची काय भूमिका आहे? असा सवाल देसाई यांनी उपस्थित केला. (हेही वाचा - Gold Price Today: सोन्याचांदीची झळाळी उतरली, बुधवारी काय आहे लेटेस्ट गोल्ड रेट) तर,  राज्याचे पोलीस महासंचालक उपस्थित आहेतर तर देशाचे केंद्रीय मंत्री या जिल्ह्यात काय करत आहे असा सवाल सरकारी वकील घरत यांनी उपस्थित केला. दरम्यान, या प्रकरणात सात मोबाईल पोलिसांना जप्त करण्याची परवानगी द्यावी, त्याच सोबत नितेश राणे तपासात अजिबात सहकार्य करत नाहीत. वरील सर्व गोष्टींचा विचार करता आरोपींचा जामीन फेटाळावा, अशी मागणीही सरकारी वकिलांनी केली. शिवसेना मोर्चा काढतंय मग दबाव कोण टाकत आहे?  सत्तेत असणारी माणसं जर मोर्चे काढत आहेत सत्ताधारी आमदार मोर्चाची भाषा करतायत मग दबाव कोण टाकतेय. सचिन सातपुते हा आरोपी आहे हे पोलिसांना समजलं कधी. नितेश राणेंच्या मोबाईल वरून आरोपीला एकही कॉल गेला असा पुरावा नाही. सचिन सातपुते यांचे भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत संबंध होते. तो भाजपचा कार्यकर्ता होता. मग नितेश राणे यांचा फोटो महत्वाचा आहे का? असा सवाल राणेचे वकील देसाई यांनी केला.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या