तुषार रुपनवर, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालाकडे (Sindhudurg District bank election result) सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. या निवडणुकीत शिवसेना आणि महाविकास आघाडीला मोठा झटका (big jolt for Mahavikas Aghadi) बसला आहे. कारण, शिवसनेचे उमेदवार आणि बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचा पराभव झाला आहे. भाजपचे विठ्ठल देसाई (BJP Vitthal Desai) हे विजयी झाले आहेत.
सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते
या निवडणूक निकालात शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई या दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली होती. मात्र, नंतर भाजपचे विठ्ठल देसाई यांनी विजय मिळवला. विठ्ठल देसाई यांच्या विजयामुळे भाजपच्या गोटात प्रचंड आनंदाचे वातावरण आहे तर महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका आहे.
दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे अखेर चिठ्ठी टाकून उमेदवार विजयी ठरवण्यात आला. चिठ्ठी टाकून भाजपचे विठ्ठल देसाई यांचा विजय झाल्याचं घोषित करण्यात आलं आहे. विद्यमान अध्यक्षांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा झटका बसला आहे.
Sindhudurg District bank election result: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक, शिवसेनेचे गणपत देसाई विजयी
मनीष दळवी विजयी
शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) मारहाण प्रकरणात सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचे नाव आले होते. या प्रकरणामुळे त्यांना मतदानाही करता आले नव्हते. मात्र, त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. मनीष दळवी यांच्या विजयाममुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
सिद्धीविनायक पॅनेल भाजपा विजयी
1. मनीष दळवी - वेंगुर्ला
2. दिलीप रावराणे - वैभववाडी
3. प्रकाश गोडस - देवगड
4. विठ्ठल देसाई - कणकवली
5. अतुल काळशेकर : पणन विभाग
6. महेश सारंग : दुग्ध विभाग
7. संदीप परब
8. समीर सावंत : वैयक्तिक मतदार संघ
9. गजानन गावडे : मजूर विभाग
10. प्रज्ञा ढवन : महिला विभाग
11. अस्मिता बांदेकर : महिल विभाग
(विठ्ठल देसाई आणि सतिश सावंत यांच्यात टाई झाली होती. अखेर विठ्ठल देसाई यांचा विजयी झाला)
महाविकास आघाडी
1. व्हिक्टर डॅाटस : मालवण
2.विद्याप्रसाद बांदेकर : कुडाळ
3.विद्याधर परब : सावंतवाडी
4.गणपत देसाई : दोडामार्ग
5. सुशांत नाईक : कणकवली
किती टक्के झाले मतदान ?
या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67 % मतदान झाले असून तालुकानिहाय कुडाळ- 213 पैकी 213 - 100 % , वेंगुर्ले - 96 पैकी 91 - 94.79 %, सावंतवाडी - 212 पैकी 211 - 99.52 %, वैभववाडी 54 पैकी 13 - 98 %, कणकवली - 165 पैकी 161 - 97.57 %, मालवण - 110 पैकी 110 - 100 % दोडामार्ग - 48 पैकी 48 - 100 %, देवगड - 98 % मतदान झाले.
बहुमताचा आकडा कोण गाठणार?
ही निवडणूक राणे आणि शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली. काल सकाळी 7 वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया 4 वाजता संपली. सकाळी 9 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालायत मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूकिच चित्र स्पष्ट होईल. 19 जागांपैकी 10 चा आकडा हा बहुमतांचा असून कोण बाजी मारत हे चित्र आज स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Shiv sena, Sindhudurg