तुषार रुपनवर, प्रतिनिधी
सिंधुदुर्ग, 31 डिसेंबर : बहुचर्चित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे निकाल (Sindhudurg District Central Co operative Bank Election Result) आता हाती येण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एक मोठा झटका बसला आहे. शिवसैनिक संतोष परब (Shivsainik Santosh Parab) मारहाण प्रकरणात सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचे नाव आले होते. या प्रकरणामुळे त्यांना मतदानाही करता आले नव्हते. मात्र, त्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
मनीष दळवी यांच्या विजयाममुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
मनीष दळवींचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवार मनीष दळवी (Manish Dalvi) यांचा अंतरिम जामीन अर्ज न्यायालयाने गुरुवारी (30 डिसेंबर) फेटाळला. न्यायलयाने अंतरिम जामीन अर्ज फेटाळल्यामुळे मनीष दळवी हे मतदानापासून वंचित राहिले होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कटात सहभाग असल्याचे समजताच मनीष दळवी यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी अंतरिम जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने तो अर्ज फेटाळला होता.
वाचा : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक, शिवसेनेचे गणपत देसाई विजयी
जिल्हा बँक निवडणूक निकाल
सिद्धीविनायक पॅनेल भाजपा विजयी
1. मनीष दळवी - वेंगुर्ला
2. दिलीप रावराणे - वैभववाडी
3. प्रकाश गोडस - देवगड
4. विठ्ठल देसाई - कणकवली
5. अतुल काळशेकर : पणन विभाग
6. महेश सारंग : दुग्ध विभाग
7. संदीप परब
8. समीर सावंत : वैयक्तिक मतदार संघ
9. गजानन गावडे : मजूर विभाग
10. प्रज्ञा ढवन : महिला विभाग
11. अस्मिता बांदेकर : महिल विभाग
(विठ्ठल देसाई आणि सतिश सावंत यांच्यात टाई झाली होती. अखेर विठ्ठल देसाई यांचा विजयी झाला)
महाविकास आघाडी
1. व्हिक्टर डॅाटस : मालवण
2.विद्याप्रसाद बांदेकर : कुडाळ
3.विद्याधर परब : सावंतवाडी
4.गणपत देसाई : दोडामार्ग
5. सुशांत नाईक : कणकवली
किती टक्के झाले मतदान ?
या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67 % मतदान झाले असून तालुकानिहाय कुडाळ- 213 पैकी 213 - 100 % , वेंगुर्ले - 96 पैकी 91 - 94.79 %, सावंतवाडी - 212 पैकी 211 - 99.52 %, वैभववाडी 54 पैकी 13 - 98 %, कणकवली - 165 पैकी 161 - 97.57 %, मालवण - 110 पैकी 110 - 100 % दोडामार्ग - 48 पैकी 48 - 100 %, देवगड - 98 % मतदान झाले.
बहुमताचा आकडा कोण गाठणार?
ही निवडणूक राणे आणि शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरली. काल सकाळी 7 वाजता सुरू झालेली मतदानाची प्रक्रिया 4 वाजता संपली. सकाळी 9 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालायत मतमोजणीला सुरुवात झाली असून दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणूकिच चित्र स्पष्ट होईल. 19 जागांपैकी 10 चा आकडा हा बहुमतांचा असून कोण बाजी मारत हे चित्र आज स्पष्ट होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Shiv sena, Sindhudurg