Home /News /maharashtra /

Sindhudurg District Bank Election: भाजपला मोठा झटका, आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

Sindhudurg District Bank Election: भाजपला मोठा झटका, आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला

Big jolt for MLA nitesh Rane: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला एक मोठा झटका बसला आहे.

    तुषार रुपनवर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग, 30 डिसेंबर : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी (Sindhudurg District Central Co operative Bank election) आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीमुळे सिंधुदुर्गात (Sindhudurg) राजकीय धुमशान पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसैनिकाला झालेल्या मारहाण प्रकरणात नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. त्यांनी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यापूर्वी नितेश राणे आणि भाजपला एक मोठा झटका बसला आहे. आमदार नितेश राणे ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे सहकार विभागाने आमदार नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे. आमदार नितेश राणेंचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये सिद्धीविनायक पॅनलचे उमेदवार मनीष दळवी यांचे नाव संतोष परब मारहाण प्रकरणात आल्यामुळे मनीष दळवी यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र निकाल प्रलंबित असल्याने आज प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मनीष दळवी आपला मतदानाचा हक्क आहे तो कसा बजावतात हे महत्वाचे ठरणार आहे. आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 4 पर्यंत 39 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे. उद्या सकाळच्या सत्रात नेमका जिल्हा बँकेवर कोण बाजी मारत हे चित्र स्पष्ट होणार आहे. वाचा : सिंधुदुर्गात धुमशान; जिल्हा बँकेसाठी मतदान तर नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार याआधी कुठल्या पक्षाची सत्ता किती जागा कुणाकडे? 2008 पासून बँक राणेंच्या अधिपत्याखाली आहे. एकूण 19 जागांसाठी शिवसेना-भाजप आणि काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 आणि अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या. सध्या कुठले पँनल निवडणुकीच्या रिंगणात? महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत. एकूण किती जागासाठी निवडणूक? एकूण 19 जागांसाठी निवडणूक एकूण 39 उमेदवार रिंगणात निवडणुकीत कुणाची प्रतिष्ठा पणाला ? केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख व विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांची ही प्रतिष्ठा लागली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Nitesh rane, Sindhudurg

    पुढील बातम्या