मुंबई 09 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. दरम्यान नुकतंच श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केला. आपला पहिल्यापासून या लिव्ह इन रिलेशनशिपला विरोध होता, मात्र श्रद्धाने याचा विरोध केला, असं ते यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी काही मागण्याही केल्या. विकास वालकर म्हणाले, की १८ वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिले जाते यावर विचार करावा. काही अॅपवर सुद्धा विचार केला पाहिजे. माझ्या मुलीबाबत जे झालं ते दुःखदायक झालं. यापुढे असं कोणाचंही होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे.
श्रद्धा घरी का येऊ शकले नाही? याचा शोध व्हायला पाहिजे. तिच्यावर कोणाचा दबाव होता? अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली. पुढे ते म्हणाले, की श्रद्धाने २०१९ रोजी केलेल्या तक्रारीबाबात मला काही माहीती नव्हती . २०२१ मध्ये श्रद्धा बरोबर बोलणे झाले होते, तेव्हा तिने सांगितले की, मी बंगळुरूमध्ये राहते.
त्यांनी सांगितलं, की आफताबबरोबर एकदा १६ सप्टेंबरला बोलणं झालं होतं. आफताबने सांगितलं की मला माहीत नाही श्रद्धा कुठे गेली .मी त्याला बोललो, तुझी ही जबाबदारी आहे. त्यावर तो काही बोलला नाही, अशी माहितीही त्यांनी दिली
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder