मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'सावरकर इंग्रजांची माफी मागून महिन्याला 60 रुपये...'; राहुल गांधींनंतर आता नाना पटोलेंचं धक्कादायक विधान

'सावरकर इंग्रजांची माफी मागून महिन्याला 60 रुपये...'; राहुल गांधींनंतर आता नाना पटोलेंचं धक्कादायक विधान

फाईल फोटो

फाईल फोटो

पुढे नाना पटोले म्हणाले, की इतकंच नाही तर सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रुपये पेन्शनदेखील घेत होते

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Kiran Pharate

राहुल खंदारे, बुलडाणा 17 नोव्हेंबर : अगोदरच राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाने महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. अशातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धक्कादायक विधान करून वादाला तोंड फोडले आहे. भगवान बिरसा मुंडा हे इंग्रजांच्या प्रलोभनांना बळी पडले नाहीत. उलट सावरकर यांनी इंग्रजांना पत्रव्यवहार करून माफी मागितली होती, असं पटोले म्हणाले.

इतक्यावरच ते थांबले नाहीतर, तर पुढे नाना पटोले म्हणाले, की इतकंच नाही तर सावरकर हे इंग्रजांकडून महिन्याला 60 रुपये पेन्शनदेखील घेत होते. सावरकरांना अपमानित करणारा विचार जमिनीत गाडणार, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीस यांच्या या विधानाचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले, की 'हेच सावरकर यांचे विचार आहेत.' नाना पटोले शेगावमध्ये आले असता याबद्दल बोलले.

अटकेतल्या नवाब मलिकांना आणखी एक धक्का, वानखेडेंवरची टीका भोवणार!

राहुल गांधींचं विधान -

याआधी राहुल गांधींनीही नुकतंच सावरकरांबाबत मोठं विधान केलं होतं. 'सावरकर खरे देशभक्त नाहीत. ते तर इंग्रज राज्यकर्त्यांकडून निवृत्ती वेतन घेत होते. एकीकडे देशासाठी अवघ्या 24 व्या वर्षी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत. सावरकरांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली. अंदमान तुरुंगातील शिक्षा कमी करण्यासाठी त्यांनी अनेकवेळा माफीची पत्रे इंग्रज सरकारला लिहिली', असं खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

फडणवीसांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर -

देवेंद्र फडणवीस म्हणाले, की 'स्वातंत्र्यवीर सावरकर हे देशातील असे एक नेते आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कारावास भोगला आणि स्वातंत्र्यानंतर उपहासाचा कारावास भोगला. आजही काँग्रेसकडून त्यांचा विचार कारावासात टाकायचं काम सुरु आहे. त्यांना राज्यातील जनताच उत्तर देईल. त्या राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 'स' माहिती नाही. ते किती वर्षे तुरुंगात होते ते ही त्यांना माहिती नाही," असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

First published:

Tags: Nana Patole, Savarkar