शिर्डी, 3 डिसेंबर : दोन दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाच्या सरी (Rainfall) कोसळत आहेत. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासोबतच थंडी (cold wave) आणि धुक्याचे (fog) प्रमाणही वाढल्याचं पहायला मिळत आहे. थंडीमुळे जुन्नर मालेगाव परिसरात शेळ्या आणि मेंढ्या दगावल्याचं वृत्त ताजे असतानाच आता दोन इसमांचा थंडीत गारठून मृत्यू झाला असल्याची बातमी समोर आली आहे. (2 died in Shirdi suspect of death due to cold wave)
मिळालेल्या माहितीनुसार, कडाक्याच्या थंडीत दोन व्यक्तींचा गारठून मृत्यू झाला असल्याचं बोललं जात आहे. अहमदनगर मनमाड महामार्गाच्या शेजारी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला तर दुसऱ्या व्यक्तीचा मृतदेह ओढ्याजवळ आढळून आला आहे. या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू थंडीत गारठून झाला असल्याचं बोललं जात आहे मात्र, या वृत्ताला अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये.
वाचा : नोटांची उधळण होणाऱ्या बारमधून जप्त केलेली रक्कम ऐकून व्हाल अवाक्
अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे नाशिक जिल्ह्यात 145 शेळ्या मेंढ्याचा मृत्यू
चांदवड तालुक्यातील मौजे तिसगाव येथे गट न. 416 मध्ये बाहेर गावातील मेंढी पाळणारे थांबले आहेत. त्यांचे कालच्या पावसाने 20 मेंढी मरण पावल्या आहेत. मौजे तळेगाव रोही येथे गिरनारे येथील मेंढपाळ सुभाष धोंडीराम गाढे यांच्या 15 मेंढ्या कालच्या अवकाळी पावसा मुळे व अति थंडी मुळे मरण पावल्या आहे. सुरेश संजय फटांगडे रा रामेश्वर ता. देवळा यांच्या मालकीच्या मौजे वडाळीभोई येथे 25 मेंढ्या रात्री तीन च्या दरम्यान मृत्यू झाल्या आहेत. सोमठान देश ता येवला येथे राजाराम बाळू सोनवणे दशरथ चंद्रभान सोनवणे यांचा प्रत्येकी 6 अशा एकूण 12 मेंढ्या दि. 1.12.2021 पावसाने व थंडीने गारठून मयत झाल्या.
मौजे वडगाव पिंगळा, तालुका सिन्नर येथील श्री रतन महादू पवार यांच्या 45 मेंढ्या पावसाने व थंडीने गारठून मयत झालेल्या आहे. मौजे सावकी, तालुका देवळा येथे योगेश मिश्राम गायकवाड यांच्या 06 मेंढ्या मृत पावल्या आहेत. दिंडोरी तालुक्यात शिंदवड येथील ताराचंद कचरू ढेपले यांच्या 10 मेंढ्या थंडीमुळे मृत झालेल्या आहेत. दिंडोरी मौजे इंदोरे शिवारात श्री शंकर तातीराम गोईकर रा विजापूर ता साक्री जि. धुळे यांच्या 12 मेंढ्या थंडीमुळे मृत पावल्या आहेत.
वाचा : अजबच! 'प्रेम पाहिजे की मटण'? पत्नीच्या त्या सवयीला कंटाळून पतीचा अल्टिमेटम
जुन्नर आंबेगाव परिसरात शेकडो मेंढ्या व बकऱ्या दगावल्या
पुणे जिल्ह्यात जुन्नर व आंबेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस आणि थंडीने शेकडो शेळ्या-मेंढया मृत्यू झाल्या आहेत. त्यामुळे पशुपालक व मेंढपाळ धास्तावले आहेत. जुन्नर तालुक्यातील राजुरी या ठिकाणी अवकाळी पावसाने व थंडीने पांच मेंढपाळांच्या जवळपास 50 मेंढ्या मृत्यूमुखी पडल्या. गोळेगाव परिसरात 15 पेक्षा जास्त शेळ्या मृत्यू पडल्यात तर आंबेगाव तालुक्यात विविध ठिकाणी 7 पेक्षा जास्त मेंढपाळा च्या 150 पेक्षा जास्त मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ शिवार मध्ये पावसामुळे व गारवामुळे 30 ते 35 मेंढरू मृत्युमुखी पडले आहेत तर शिंगवे पारगाव इथे 20-25 आणि खडकी पिंपळगाव इथे 40-45 मेंढ्या रात्री पडलेल्या पावसामुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील 3 मेंढ्या रात्री मृत्युमुखी पडलेल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rain, Shirdi, महाराष्ट्र