मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मीरारोडमध्ये ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा, नोटांची उधळण होणाऱ्या बारमध्ये मिळाले अवघे 540 रुपये, चर्चांना उधाण

मीरारोडमध्ये ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा, नोटांची उधळण होणाऱ्या बारमध्ये मिळाले अवघे 540 रुपये, चर्चांना उधाण

ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा, नोटांची उधळण होणाऱ्या बारमधून जप्त केलेली रक्कम ऐकून व्हाल अवाक् (प्रातिनिधिक फोटो)

ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा, नोटांची उधळण होणाऱ्या बारमधून जप्त केलेली रक्कम ऐकून व्हाल अवाक् (प्रातिनिधिक फोटो)

Raid on Orchestra bar: पोलिसांनी एका ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकत कवारवाई केली आहे.

  मीरा रोड, 3 डिसेंबर : ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकून पोलिसांनी कारवाई (raid on orchestra bar) केली आहे. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी 17 जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी या कारवाई दरम्यान घटनास्थळावरुन जप्त केलेली रोकड बाबत आता विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मीरा रोड पोलिसांच्या (Mira Road Police) पथकाने 29 नोव्हेंबर रोजी शीतल नगर परिसरात असलेल्या यश 9 या ऑक्रेस्ट्रा बारवर छापा टाकला. यावेळी तेथे अनेकजण मद्यपान करताना आढून आले. तसेच बारमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याचंही निदर्शनास आलं. यावेळी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली असता 20 रुपयांच्या 27 नोटा म्हणजेच 540 रुपयांची रोकड जप्त केली. ऑर्केस्ट्रा बारमधून केवळ 540 रुपयांची रोकड जप्त कऱण्यात आल्याने विविध चर्चा होत आहे.

  नोटांची उधळण होणाऱ्या बारमध्ये केवळ 540 रुपये

  बारमध्ये महिला डान्सर यांच्यावर ग्राहक पैशांची उधळण करत असल्याचं तुम्ही अनेकदा सिनेमात पाहिलं असेल. यासाठी मोठ्या नोटांचे सुटे पैसे म्हणजेच 10 रुपये, 20 रुपये किंवा 50-100 रुपयांच्या नोटांचे बंडल ग्राहकांना देण्यात येतात. यानंतर याच पैशांची ग्राहकांकडून बारमधील डान्सरवर उधळण करण्यात येते. त्यामुळे बारमधून केवळ 540 रुपयांचीच रोकड जप्त करण्यात आल्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

  वाचा : पुण्यात नामांकित सराफांना गंडा; महिलेचा कारनामा पाहून सर्वांनाच धक्का, पाहा CCTV

  घरांमध्ये सुरू होता ऑर्केस्ट्रा बार?

  ज्या ऑर्केस्ट्रा बारवरही कारवाई करण्यात आली आहे त्याब्बत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हा ऑर्केस्ट्रा बार ज्या इमारतीत आहे ती इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. तसेच ही इमारत तोडण्याचीही मागणी होत आहे. यासोबतच इमारतीमधील तीन ते चार खोल्या एकत्र करुन हा ऑर्केस्ट्रा बार तयार करण्यात आला असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ऑर्केस्ट्रा बार कसा सुरू होता आणि कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू होता असेही सवाल उपस्थित केले जात आहेत.

  वाचा : Mumbai मध्ये Sex Tourism रॅकेटचा पर्दाफाश

  मीरारोड पोलिसांच्या भरोसा सेलच्या पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे, अमली पदार्थ विभागाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे आणि स्थानि गुन्हे शाखाने मिळून ही कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी एकूण 17 जणांवर कारवाई केली आहे. यामध्ये कॅशिअर, मॅनेजर, वेटर, पुरुष गायक आणि वादक यांच्याही समावेश आहे.

  बारामतीमध्ये Sex Racket चा पर्दाफाश

  पुणे जिल्ह्यातील (Pune district) बारामतीत पोलिसांनी (Baramati Police) गेल्या महिन्यात मोठी कारवाई केली आहे. बारामती पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (Sex racket busted) केला आहे. बारामती शहरातील गणेश मार्केट भाजी मंडई परिसरात हा सेक्स रॅकेट सुरू होतं. पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरुन दोन महिलांची सुटका केली आहे. भाजी मंडई परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती बारामती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर बारामती पोलिसांनी रात्रीच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन पोलिसांनी महिला एंजटला अटक केली आहे. तर दोन महिलांची सुटका केली आहे.

  First published:

  Tags: Crime, Police, महाराष्ट्र