जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मैदान 'शिंदें'चं पण हवं उद्धवना, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लान बी!

मैदान 'शिंदें'चं पण हवं उद्धवना, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लान बी!

मैदान 'शिंदें'चं पण हवं उद्धवना, दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंचा प्लान बी!

शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अजूनही संभ्रम आहे. दसरा मेळाव्याला अजूनही परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्लान बीची तयारी केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 सप्टेंबर : शिवाजी पार्कवर होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून अजूनही संभ्रम आहे. मुंबई महापालिकेकडून अजूनही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. दसरा मेळाव्याला अजूनही परवानगी मिळाली नसल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी प्लान बीची तयारी केली आहे. शिवसेनेची संस्था असलेल्या भारतीय कामगार सेनेनं बीकेसी मैदान दसरा मेळाव्यासाठी मिळावं, यासाठी एमएमआरडीएला पत्र लिहिलं आहे, पण एमएमआरडीए हे नगरविकास खात्याच्या म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत येतं, त्यामुळे आता एमएमआरडीएवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दसरा मेळावा घ्यायला परवानगी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याआधी शिवाजी पार्कवर नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्याला परवानगी मिळावी, यासाठी उद्धव ठाकरेंकडून मुंबई महापालिकेला पत्र दिलं गेलं होतं. तर एकनाथ शिंदे यांच्या गटानेही शिवाजी पार्कवर सभा घ्यायला आम्हाला परवानगी द्या, अशी मागणी करणारं पत्र बीएमसीला लिहिलं. या दोन्ही पत्रांवर बीएमसीकडून अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्यामुळे आता उद्धव ठाकरेंकडून बीकेसी मैदानाची मागणी झाली आहे. मैदान देण्यावरून अडचण का राजकारण? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मैदान देण्यावरून राजकारण सुरू आहे का सुप्रीम कोर्टात अडचण होऊ नये म्हणून परवानगी मिळत नाहीये, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरून सध्या सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला परवानगी मिळावी, असं पत्र पाठवण्यात आलं. यातलं एक पत्र शिवाजी पार्कसाठी बीएमसीला आणि दुसरं पत्र बीकेसी मैदानासाठी एमएमआरडीएला पाठवण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही मैदानांना परवानगी देणाऱ्या यंत्रणा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यामध्ये येतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला यातल्या एका मैदानात जरी परवानगी दिली तरी याचा वापर सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी केला जाऊ शकतो. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या नगरविकास खात्याने शिवसेनेच्या पर्यायाने उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला परवानगी दिली, हे ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात सांगितलं जाऊ शकतं, जे शिंदेंसाठी अडचणीचं ठरू शकतं.

दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरेंकडून पत्र

दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. कालच एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली, या बैठकीत दसरा मेळाव्याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात