जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात राम शिंदेंची सरशी, सत्तांतर होताच ढासळला बुरूज

रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात राम शिंदेंची सरशी, सत्तांतर होताच ढासळला बुरूज

रोहित पवारांच्या बालेकिल्ल्यात राम शिंदेंची सरशी, सत्तांतर होताच ढासळला बुरूज

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर होणारे परिणाम या निवडणुकीतही जाणवू लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना याचा धक्का बसला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 ऑगस्ट : राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram Panchyat Election 2022)  लागण्यास सुरूवात झाली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर होणारे परिणाम या निवडणुकीतही जाणवू लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना याचा धक्का बसला आहे. विधान परिषेदवर काही महिन्यापूर्वी निवडून गेलेले भाजपा आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी पवारांना ग्रामपंचायत निवडणुकीत हादरा दिला आहे. रोहित पवार आमदार असलेल्या नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातील तीन्ही ग्रामपंचायतीमध्ये राम शिंदे यांच्या गटानं विजय मिळवला आहे. या ग्रामपंचायतींचा निकाल रोहित पवार यांच्यासाठी मोठा सेटबॅक मानला जात आहे. कोरेगावमध्ये 13 पैकी 7, बजरंगवाडीमध्ये 7 पैकी 5 तर कुळधरण ग्रामपंचायतीमध्ये 13 पैकी 7 जागांवर शिंदे गटानं बाजी मारली आहे. राम शिंदे यापूर्वी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मागील विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर या मतदार संघात पवारांनी राष्ट्रवादीचं बस्तान बसवलं होतं. आता राज्यात सत्तांतर होताच मतदारसंघातील वारं पुन्हा फिरलं असून या निवडणुकीत राम शिंदे यांनी बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; मुंबै बँकेतही सत्तांतर, अध्यक्षपदी प्रवीण दरेकर सोलापूरात ठाकरेंना दिलासा सोलापूर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे  7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहे.  त्यामुळे उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. सोलापुरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिलं खातं उघडण्यास सुरुवात केली आहे.  दक्षिण सोलापूर तालुका युवासेना प्रमुख धर्मराज बगले यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर ठाकरे गटांनी वर्चस्व मिळवलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात