मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'..म्हणून स्मृती इराणी अस्थिर आणि अस्वस्थ, हे किळसवाणं प्रदर्शन करू नका'; शिवसेनेचा हल्लाबोल

'..म्हणून स्मृती इराणी अस्थिर आणि अस्वस्थ, हे किळसवाणं प्रदर्शन करू नका'; शिवसेनेचा हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी या विषयांवर गप्प बसणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राष्ट्रपतींच्या अपमानावरून उसळून उठतात हे गमतीचे तितकेच कौतुकाचे आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महागाई, बेरोजगारी या विषयांवर गप्प बसणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राष्ट्रपतींच्या अपमानावरून उसळून उठतात हे गमतीचे तितकेच कौतुकाचे आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महागाई, बेरोजगारी या विषयांवर गप्प बसणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राष्ट्रपतींच्या अपमानावरून उसळून उठतात हे गमतीचे तितकेच कौतुकाचे आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 30 जुलै : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी 'राष्ट्रपती' ऐवजी 'राष्ट्रपत्नी' हा शब्द वापरला होता. आता या शब्दावरुन वाद निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि स्मृती इराणी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सामनाचा अग्रलेख -

महागाई, बेरोजगारी या विषयांवर गप्प बसणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राष्ट्रपतींच्या अपमानावरून उसळून उठतात हे गमतीचे तितकेच कौतुकाचे आहे. मुळात राष्ट्रपती किंवा राज्यपालांची मानप्रतिष्ठा आपल्या देशात आज राहिली आहे काय? राष्ट्रपतींची निवड सत्ताधारी पक्षच करतो, पण राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाकापेक्षा मोती जड ठरेल असा असू नये याची व्यवस्था पंतप्रधान व त्यांचा सत्ताधारी पक्ष घेत असतो. या सगळ्या प्रकरणात राज्यघटनेचे नाक अनेकदा कापले गेले आहे. त्याची चिंता कोणी करेल काय?

राष्ट्रपतींच्या अपमानावरून भाजप व काँग्रेस एकमेकांना भिडले आहेत. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केला. त्यामुळे भाजपने आक्षेप घेतला. राष्ट्रपतीपदी एका महिलेची निवड झाल्याने त्यांचा नामोच्चार नेमका कसा करावा? हा प्रश्न प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या तेव्हाही अनेकांना पडलाच होता, पण त्यांचा उल्लेख राष्ट्रपती असाच होऊ लागला. इंग्रजी भाषेत महिला राष्ट्रपतीचा उल्लेख ‘मॅडम प्रेसिडेंट’ असा केला जातो, पण मराठीत व अन्य भाषांत काय करायचे? एकतर यापुढे ‘राष्ट्राध्यक्ष’ असे संबोधन करावे वा दुसरा संदर्भ शोधावा लागेल. त्याच गोंधळातून अनेकांची जीभ घसरते, पण जीभ घसरली व त्याचे राजकारण झाले.

मराठा समाजाला मोठा धक्का, EWS आरक्षणाच्या लाभापासून मुकणार; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!

राष्ट्रपतींचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ असा केल्याने अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची माफी मागितली आहे. स्वतः सोनिया गांधी यांनी हात जोडून माफी मागितली. त्यामुळे हा विषय संपायला हवा, पण यानिमित्ताने भाजपच्या हाती कोलीत लागले व त्यांनी भलताच गोंधळ घातला. संसदेत भाजपच्या स्मृती इराणी या प्रश्नी नको तितक्या आक्रमक झाल्या व त्यांनी सोनिया गांधींशी असभ्य वर्तन केले. सोनिया गांधींच्या विरोधात भाजपने आक्षेपार्ह घोषणा दिल्या. हे सर्व लोकसभेत घडले. स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यातील बेकायदेशीर दारू बार प्रकरण काँग्रेसने उघड केल्यापासून त्यांचे नव अस्थिर व अस्वस्थ आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते जाणवते. म्हणून आपल्या राजनिष्ठेचे असे किळसवाणे प्रदर्शन कोणी करू नये.

सोनिया गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यातला हा झगडा संसदीय लोकशाहीचे खरे स्वरूप दाखवणारा आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी एक आदिवासी महिला विराजमान झाली व त्यांचे स्वागत देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने केले. शिवसेनेसारख्या ‘एनडीए’बाह्य पक्षानेही श्रीमती मुर्मू यांना पाठिंबा दिला. मुर्मू निवडून आल्या हा देशासाठी आनंदाचा क्षण असताना त्यास असे गालबोट लागावे हे बरे नाही. संसदेत गेल्या आठवडय़ापासून महागाई, बेरोजगारीवरून विरोधक निदर्शने करीत आहेत. राज्यसभा व लोकसभेतील खासदार महागाई, बेरोजगारीवरून सरकारला प्रश्न विचारतात या सबबीखाली 27 खासदारांचे निलंबन करण्यात आले.

महागाई, बेरोजगारी या विषयांवर गप्प बसणारे सत्ताधारी पक्षाचे खासदार राष्ट्रपतींच्या अपमानावरून उसळून उठतात हे गमतीचे तितकेच कौतुकाचे आहे. मुळात राष्ट्रपती किंवा राज्यपालांची मानप्रतिष्ठा आपल्या देशात आज राहिली आहे काय? देशातील कायदा, घटना, व्यक्तिगत स्वातंत्र्य, न्यायालयांची प्रतिष्ठा यांची उघड पायमल्ली सुरू असताना आपले राष्ट्रपती व राज्यपाल काहीच ठोस भूमिका घेत नाहीत. महाराष्ट्रात तर राज्यपालांनी सरळ सरळ एका बेकायदेशीर सरकारला शपथ दिली व हे सरकार अद्याप मंत्रिमंडळ बनवू शकले नाही. अशा वेळी घटनेचे चौकीदार म्हणून राष्ट्रपती हस्तक्षेप करत नसतील तर ते राष्ट्रपतीपदाचेच अवमूल्यन आहे.

शिवसेना पक्षानंतर आता कुटुंबात उभी फूट? फॅमिली ट्रीमधून कळेल काका-पुतण्याचा संघर्ष

राष्ट्रपती म्हणजे ‘रबर स्टॅम्प’ बनले आहेत अशी जनभावना आहेच व राष्ट्रपती त्या जनभावनेस आपल्या वर्तणुकीने खतपाणी घालत असतात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाप्रमाणे हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींना सर्वाधिकार नाहीत. मंत्रिमंडळाच्या शिफारसीनुसार त्यांना काम करावे लागते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवड झाल्यावर अब्राहम लिंकन म्हणाले होते-

“एका महत्त्वाच्या पदावर विशिष्ट कालावधीसाठी माझी निवड करण्यात आली आहे. तुमच्या दृष्टीने आज मला जो मोठा अधिकार प्राप्त झालेला आहे, तो काही वर्षांनी नाहीसा होणार आहे. लोकहो, तुम्ही स्वतःशी आणि राज्यघटनेशी प्रामाणिक राहिलात तर मी कितीही दुष्ट बुद्धीने प्रशासन केले किंवा मूर्खपणाने वागलो आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तरीही मी तुमचे फार नुकसान करू शकणार नाही.’’

राष्ट्राध्यक्ष लिंकन यांची ही अकृत्रिम विनम्रता कोणीकडे आणि आपल्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा सत्तेचा उन्माद कोणीकडे! राष्ट्रपतींची निवड सत्ताधारी पक्षच करतो, पण राष्ट्रपतीपदाचा उमेदवार नाकापेक्षा मोती जड ठरेल असा असू नये याची व्यवस्था पंतप्रधान व त्यांचा सत्ताधारी पक्ष घेत असतो. या सगळ्या प्रकरणात राज्यघटनेचे नाक अनेकदा कापले गेले आहे. त्याची चिंता कोणी करेल काय?

First published:

Tags: BJP, Shivsena, Smriti irani