मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार, सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटलांना इशारा

मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार, सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटलांना इशारा

मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार

मी तुम्हाला सळो की पळो करुन सोडणार

मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

जळगाव, 1 नोव्हेंबर : ठाकरे आणि शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. एका गटाच्या आरोपानंतर दुसऱ्या गटातून त्याला प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज धरणगाव येथे प्रबोधन सभा घेऊन शिंदे गटावर चौफेर टीका केली. यातही गुलाबराव पाटील यांच्यावर अंधारे यांनी सडकून टीका केली. मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशाराच त्यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

आमचे नेतृत्व हे संयमी व शिस्तबद्ध आहे. आमचे 40 भाऊ तिकडे गेले आहे, त्यातील एक शेरो शायरी करणारे भाऊ गुलाबराव पाटील. एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची असे गुलाबराव पाटील म्हणतात. मात्र, ते कधीपासून पद भोगत आहेत. याचा पाढाच सुषमा अंधारे यांनी वाचला. गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. तुम्ही 20 वर्ष वेगवेगळ्या मार्गाने सत्ता भोगत आहात. मग इतर कार्यकर्त्यांना तुम्ही पुढे करून त्यांना सत्तेवर का आणलं नाही?

दसऱ्या मेळाव्यात वक्तव्य करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची होती. युपी, बिहारमधून लोकांना सभेसाठी बोलवलं. लोकशाही व इतर प्रसार माध्यमांवर याबाबत बातम्या आल्या आहेत. निधी बाबत यांनी बोलायची का हिंमत केली नाही? तेव्हा का दातखिळी बसली? असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. तुम्ही जर हिंदुत्वासाठी तिकडे गेला असाल तर मग 40 लोकांनी हिंदुत्वासाठी जीव पणाला लावायला पाहिजे. यापूर्वी राणे गेले, भुजबळ गेले. मात्र, ते त्यांच्या जीवावर गेले याचा विचार गुलाबराव पाटलांनी करायला हवा होता. ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घान करण्याची वृत्ती असल्याची टीका गुलाबराव पाटील यांच्यावर केली.

वाचा - ठाकरे-सत्तार संघर्ष वाढणार, आदित्य ठाकरेंची तोफ सत्तारांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार!

मी 3 महिन्याच बाळ आहे तर त्यांनी लक्षात घ्यावं की बाल निष्पाप असतं. गुलाबराव पाटील 30 वर्षात तुम्हाला कमावता आले नाही ते सुषमा अंधारेने 3 महिन्यात कमावले. जळगाव जिल्ह्यात 2 हजार 591 लोकांचे जीव गेले. मात्र, त्यासाठी लागणारे 5 हजार रुपयांचे व्हेंटिलेटर 12 लाख रुपयाला खरेदी केले. व्हेंटिलेटरमध्ये लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटलांवर आरोप.

गुलाबरावांना पाटलांना झोप लागणार नाही : अंधारे

गुलाबराव गद्दारीचा शिक्का घेऊन फिरताय. गुलाबराव पाटील पाणीवाला बाबा व्हायचं म्हणाताय. मात्र, 25 दिवस धरणगावमध्ये पाणी सुटतं नाही. पाणी पिनेवाला बाबा तुम्ही आहात. मात्र, ते पिण्याचं पाणी आहे की सायंकाळी ग्लास मध्ये घेण्यात येणारे पाणी आहे याचा शोध घ्यायला हवा. गुलाबराव पाटील मला बाई म्हणून एकेरी शब्दात बोलतात. मी तुमचा उल्लेख हजारवेळा भाऊ म्हणुन करते आणि तुम्ही माझा एकेरी उल्लेख करता. शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पण, त्यावर चकार शब्द बोलत नाहीत. आज मी बोलल्यावर आज आमच्या भावाला यांना झोप लागणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यावर बाहेर पडले नसल्याची टीका हे करतात. मात्र, तुम्ही काय केलं? आरत्या, दांडिया आणि श्राद्ध करत फिरत आहात.

First published:

Tags: Eknath Shinde, Gulabrao patil