बीड, 17 जानेवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याचे आहे, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्ला बोल केला. तसेच निवडणूक आयोग आणि शिंदे गटाची साठ गाठ झाली आहे का?, अशी टीकाही त्यांनी केली. म्हणे पक्ष प्रमूखच बेकायदेशीर आहेत, निवडणूक आयोग घराचा आहे का, या शब्दात सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. सुषमा अंधारे या बीडमध्ये बोलत होत्या. नरेंद्र मोदीजींच्या पोस्टरला काळे फासणाऱ्या सत्यजित तांबेला देवेंद्र फडणवीस जवळ करत आहेत, हे धोक्याचे आहे, असे म्हणत शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर हल्ला बोल केला. त्या बीड जिल्हा दौऱ्यावर आल्या असता शिवसेनेना पदाधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण बैठकीस संबोधन करताना त्या बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमची खरी शिवसेना नाही, आमचे जिल्हा प्रमुख खरे नाहीत पण आम्हाला आमची वस्तुस्थिती माहीत आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निर्णय दिला नाही. हे लोक कॉप्या करून पास झाले आहेत आणि त्यांना खरे माहीत नाही. हेही वाचा - वंचितला मविआमध्ये येण्याचा मार्ग मोकळा, अजितदादांनी सांगितला फॉर्म्युला 40 आमदार जे गेलेत ते आमच्याच पक्षातून निवडणूक लढवून गेलेत. मग त्यांच्या निवडणूक फॉर्मवर सूचक अनुमोदन म्हणून सुभाष देसाई, निलम ताई गोरे, संजय राऊत यांनीच सह्या केल्या आहेत. मग ते काय खरे शिवसैनिक नाहीत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.