मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संजय राठोडांच्या अडचणीत वाढ? त्या महिलेचा जबाब नोंदवला, 2 तास बंददाराआड चौकशी

संजय राठोडांच्या अडचणीत वाढ? त्या महिलेचा जबाब नोंदवला, 2 तास बंददाराआड चौकशी

आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली.

आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली.

आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली.

यवतमाळ, 14 ऑगस्ट : शिवसेनेचे (shivsena) नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर एका महिलेनं पोलिसांना पत्र पाठवून गंभीर आरोप केले होते. आज त्या महिलेचा बंद खोलीत जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच, दोन तास सखोल चौकशीही करण्यात आल्याची माहिती समोर  आली आहे.

घाटंजी तालुक्यातील सेवानगर येथील एका महिलेने घाटंजी पोलीस व पोलीस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठविले. त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले. आज जबाब नोंदविण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली. विशेष तपास पथकाने बंदद्वार दोन तास महिलेची चौकशी केली.

मोठी सुवर्णसंधी! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये 'या' पदांसाठी भरती; करा अर्ज

महिलेच्या पत्राची  गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी तत्काळ विशेष चौकशी पथकाचे गठन केले. शुक्रवारी एसआयटीने बयान नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांची प्रकृती बरोबर नाही. माझीही मनस्थिती बरोबर नाही, असे निवेदन पोलिसांना दिले होते. अखेर आज जबाब देण्यासाठी महिला पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

Tokyo Olympic मध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्राला दोन दिवसांपासून ताप

यावेळी पथक प्रमुख अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्यासह अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे, घाटंजीचे पोलिस निरीक्षक बबन कराळे, सायबर सेल, महिला सेल, भरोसा सेल प्रमुख उपस्थित होते.संपूर्ण चौकशी झाल्यानंतर संबंधित महिलाही चारचाकी वाहनांमध्ये गावाकडे परतली.

या महिलेनं संजय राठोडांवर काय केला आरोप?

पतीला नोकरीवर पूर्ववत घेण्यासाठी माजी मंत्री संजय राठोड यांनी शरीर सुखाची मागणी केली, असा गंभीर आरोप या महिलेने घाटंजी पोलीस ठाण्यात पाठविलेल्या तक्रारीत केला आहे. ही तक्रार घाटनजी पोलिसांनी जिल्हा अधीक्षक कार्यालयाला पाठवून या बाबत कारवाई संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नि दिली.

माजी मंत्री संजय राठोड याच्या संस्थेवर 3 शिक्षक कार्यरत होते. दरम्यान गैरवर्तवणुकीमुळे त्या शिक्षकांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर एका शिक्षणाच्या पत्नीने, पतीला पूर्ववत  कामावर घेण्यात यावे यासाठी धमकी दिली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर मोबाईलवर मेसेज ही पाठवले. मात्र तिच्या पतीला कामावर घेतले नाही. या प्रकरणात या महिलेने घाटंजी पोलिसांना पोस्टाद्वारे तक्रार पाठवून संजय राठोड यांच्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला. या आरोप नंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात उडी घेतली आणि ट्विट केले.

First published: