मुंबई, 14 ऑगस्ट: महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये (Maharashtra Natural Gas Ltd) लवकरच विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ व्यवस्थापक/प्रमुख. व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापक/वरिष्ठ. व्यवस्थापक आणि उपमहाव्यवस्थापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदासाठी भरती
वरिष्ठ व्यवस्थापक/प्रमुख.व्यवस्थापक (Senior Manager/Ch. Manager)
वरिष्ठ अधिकारी/सहाय्यक व्यवस्थापक (Senior Officer/Assistant Manager)
व्यवस्थापक/वरिष्ठ. व्यवस्थापक (Manager/Sr. Manager)
उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
हे वाचा - डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी पुणे इथे नोकरीची सुवर्णसंधी
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभवी उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी https://www.mngl.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs