मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत, विजय साळवींना तडीपारीची नोटीस

उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार अडचणीत, विजय साळवींना तडीपारीची नोटीस

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस देण्यात आी आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून तुम्हाला 2 वर्षांसाठी तडीपार का करण्यात येऊ नये? असं पोलिसांनी या नोटीसमध्ये विजय साळवी यांना विचारलं आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali), India
  • Published by:  Shreyas

कल्याण, 26 सप्टेंबर : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस देण्यात आी आहे. ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यातून तुम्हाला 2 वर्षांसाठी तडीपार का करण्यात येऊ नये? असं पोलिसांनी या नोटीसमध्ये विजय साळवी यांना विचारलं आहे. पोलिसांच्या या अन्यायकारक कारवाईला आपण कायदेशीर उत्तर देणार असल्याचं स्पष्टीकरण साळवी यांनी दिलं आहे, पण ते कॅमेरासमोर बोलायला तयार नाहीत.

विजय साळवींच्या नोटीसमध्ये काय?

'महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिवाजी चौक, कल्याण पश्चिम, तेजश्री बिल्डिंग, एमएसईबीच्या कार्यलाजवळ, महात्मा फुले चौक, भाजप शहर कार्यालय, अहिल्याबाई चौक, लाल चौकी, खडकपाडा या सगळ्या सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अपराध केले आहेत. अजूनही अपराध करत आहात. तुम्ही खडपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २/२०४ महावीर नगरी टॉवर, खडपाडा कल्याण पश्चिम या ठिकाणी वास्तव्यास आहात. तुमचे गुन्हेगारीचे क्षेत्र हे महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यातील आजाबाजूचा परिसर आहे', असं या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

तुम्ही ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या कोणत्याही भागात राहिलात तर गुन्हेगारी हालचाली आणि कारवाया करू शकता, त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यातून तुम्हाला हद्दपार करण्याचे प्रस्तावित केले आहे, असं या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shivsena, Uddhav Thackeray