स्वस्तात पेट्रोल देण्याचा उपक्रम शिवसेना आमदार वैभव नाईकांना पडला महागात

शनिवारी शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजप कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले.

शनिवारी शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. भाजप कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले.

  • Share this:
    सिंधुदुर्ग, 20 जून: शनिवारी शिवसेना भवननंतर आता सिंधुदुर्गमध्ये शिवसेना (Shivsena) आणि भाजपच्या (Bjp) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या शिवसेना भवनाबाहेर झालेला वाद थंड होत नाही. तोवर पुन्हा एकदा सिंधुदुर्गमध्ये वादाची ठिणगी पडली. सिंधुदुर्गात शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला. भाजप कार्यकर्ते आणि आमदार वैभव नाईक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप- शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढचा अनर्थ टळला. मात्र यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमावबंदीच उल्लंघन केलं. शनिवारी झालेल्या वादानंतर आता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना आणि भाजपच्या 40 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये हे गुन्हे दाखल केलेत. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्याच्या मनाई आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. या गुन्ह्यांची 141, 143, 149, 188,269, 270 या कलमाखाली नोंद करण्यात आली आहे. नेमकी घटना काय? शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र या आयोजनात त्यांनी भाजप (BJP)ला डिवचण्याचाही प्रयत्न केला. वर्धापनानिमित्त वैभव नाईक यांनी स्वस्त दरात पेट्रोल वाटपाची घोषणा केली. उपक्रमानुसार एका पेट्रोल पंपावर स्वस्तात पेट्रोल वाटप सुरु केलं गेलं. मात्र ते पेट्रोल पंप नारायण राणे यांच्या मालकीचं होतं. हेही वाचा- स्वबळावर निवडणुका लढण्याचा नारा देणाऱ्यांना संजय राऊतांचा टोला पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल खरेदी करण्यासाठी वैभव नाईक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तिथे भाजपचे कार्येकर्ते आले आणि त्यांनी यावर आक्षेप घेतला. त्यानंतर या आक्षेपाचं रुपांतर वादात झालं. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु करत एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वैभव नाईक यांनीही या हाणामारीत भाग घेतला. ते सुद्धा भाजप कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले. मात्र पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप केल्यानं पुढील अनर्थ टळला. वैभव नाईक यांच्या उपक्रमात सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांत 2 लिटर पेट्रोल (प्रति वाहन) देण्यात येणार होतं. भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी 1 लीटर पेट्रोलचे मोफत वाटप करण्यात येणार होतं. आमदाराच्या उपक्रमाची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली.
    Published by:Pooja Vichare
    First published: