• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • शिवसेना-मनसेत मोठा संघर्ष झालेल्या गावात अखेर कोणी मारली बाजी? निकाल आला हाती

शिवसेना-मनसेत मोठा संघर्ष झालेल्या गावात अखेर कोणी मारली बाजी? निकाल आला हाती

सरपंच पदाचा मान शिवसेनेला की मनसेला याची गेल्या काही दिवसांपासून लागलेली उत्सुकता आणखी एक दिवस लांबली होती.

  • Share this:
डोंबिवली, 9 फेब्रुवारी : खोणी वडवली ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक अखेर मंगळवारी पार पडली. सोमवारी गणपूर्तता न झाल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे सरपंच पदाचा मान शिवसेनेला की मनसेला याची गेल्या काही दिवसांपासून लागलेली उत्सुकता आणखी एक दिवस लांबली होती. अखेर मंगळवारी नऊ सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले आणि 5 - 3 च्या मताधिक्याने शिवसेनेने सरपंच व उपसरपंच दोन्ही पदावर आपले शिक्कामोर्तब केले. खोणी वडवली ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे 5, मनसेचे 3, भाजपचे 2, तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य निवडून आल्याने सरपंच पदासाठी सेना-मनसे मध्ये चुरस लागली. त्यातच सोमवारी दिलेल्या वेळेत शिवसेनेचे 5 सदस्य सोडले तर इतर कोणीही सदस्य अर्ज भरण्याकरीता आले नसल्याने ही निवड प्रक्रीया स्थगित करण्यात आली होती. हेही वाचा - महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपची योजना ठरली, आता 2 मुद्द्यांवरच देणार लक्ष! मंगळवारी निवड प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. गावात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्तात आणखी वाढ करण्यात आली होती. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात निवडून आलेले सदस्य वगळता कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता. शिवसैनिकांनी शिवसेनेच्या कार्यालयावर सकाळपासून गर्दी केली होती. परंतु त्यांचीही संख्या तुरळकच दिसून आली. दुपारी 2 च्या सुमारास शिवसेना मनसे दोन्ही पक्षाचे सदस्य ग्रामपंचायत कार्यालयावर दाखल झाले आणि निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर 2.30 च्या सुमारास सदस्य बाहेर आल्यानंतर 5-3 ने शिवसेनेचा विजय झाल्याचे घोषित केले गेले. यावेळी 1 सदस्य तटस्थ राहिले. शिवसेनेचा भगवा फडकताच गावात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. खोणी वडवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना ठोंबरे तर उपसरपंचपदी योगेश ठाकरे यांचा विजय झाला. शिवसेनेचा भगवा फडकताच शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेही गावात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आले. यावेळी शिंदे यांनी सांगितले आज जशी ग्रामपंचायत निवडणूक जिंकली त्याचप्रमाणे येत्या महापालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेचाच भगवा फडकेल. दुसरीकडे, पोसरी ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि मनसेने युती केल्याचे दिसून आलं आहे. भाजपच्या नंदिनी पाटील यांची सरपंच पदी निवड तर मनसेच्या राहूल ठाकरे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे. उद्या 10 तारखेला मांगरुळ, नेवाळी, हाजीमलंग वाडी, नाणेर, बुद्रुल आणि उसाटणे या गावांमध्ये सरपंच पदी कोण बसणार, याची उत्सुकता ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.
Published by:Akshay Shitole
First published: