सातारा, 21 ऑगस्ट : साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. खासदार उदयनराजे भोसले दहीहंडी कार्यक्रम स्थळी आगमन झाल्यानंतर समर्थक आणि गोविंदांमध्ये एकच जल्लोष पहायला मिळाला. खासदार उदयनराजे यांनी मंचावर आपल्या स्टाईलने एंट्री करतं दहीहंडी फोडली. यानंतर ते मंचावर खुर्चीवर बसले तेव्हा तरुणांचा जल्लोष पाहून उदयनराजे भारावले. विशेष म्हणजे यावेळी आणखी एक मनाला स्पर्श करणारी घटना घडली. उदयनराजे यांनी दहीहंडीला सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाच्या एका चिमुकल्याला लाडात चक्क खांद्यावर घेतलं. हे पाहून मंचावरील सर्व मंडळी आवाक झाले. छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले आज साताऱ्यातील एका कार्यक्रमात खूप भावनिक झाले. त्यांनी आपल्या समर्थक तरुणांना तुम्ही माझी कॉलर आहात, असं म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर मंचासमोर असलेल्या गर्दीत प्रचंड घोषणाबाजीला सुरुवात होते. उदयनराजे आपल्या समर्थक तरुणांना आपल्या कुटुंबाचे अविभाज्य भाग असल्याचे म्हणाले. यावेळी उदयनराजे प्रचंड भावनिक झालेले बघायला मिळाले.
...आणि उदयनराजेंनी चिमुकल्याला खांद्यावर उचललं, पाहा VIDEO #UdayanrajeBhosale #satara #udayanraje pic.twitter.com/A2oHu6Segn
— News18Lokmat (@News18lokmat) August 21, 2022
( ‘कार्ट्यांनो, तुम्ही माझी कॉलर’, उदयनराजे प्रचंड भारावले, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद ) उदयनराजे भाषण करताना भावनिक झाले. सगळी आपलीच गँग आहे, असं ते उपस्थित तरुणांकडे बघून म्हणाले. यावेळी तरुणांमध्येही प्रचंड जल्लोष बघायला मिळाले. त्यांनी उदयनराजेंच्या नावाने जयजयकार केला. त्यांच्या जयघोषाच्या घोषणा केल्या.
VIDEO : कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून खासदार उदयनराजे भारावले, त्यांचा भावूक झाल्याचा व्हिडीओ समोर #UdayanrajeBhosale #satara #udayanraje pic.twitter.com/RQdKkOco1x
— News18Lokmat (@News18lokmat) August 21, 2022
“आत्या, माऊशी, काका, काकू ही सगळी नाती जन्मत: रेडीमेड मिळतात. पण तुमच्यासारख्या लोकांनी प्रेम दिलं त्याचं शब्दात मी वर्णन करु शकत नाही. तुम्ही माझ्यासाठी फॅमिली आहात. असं प्रेम करु नका. कारण लोकांना स्वार्थ असेल असं वाटतं”, असं म्हणत उदयनराजे भावूक झाले.