जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / संजय राऊतांनी वाजवला चुकीचा 'भोंगा', मनसेवर केलेली टीका भोवण्याची शक्यता

संजय राऊतांनी वाजवला चुकीचा 'भोंगा', मनसेवर केलेली टीका भोवण्याची शक्यता

संजय राऊत यांनी दिलेली माहिती अर्धवट असल्याचे समोर आले आहे. त्र्यंबकेश्वरला काकड आरती होतच नसल्याची माहिती समोर आली आहे

संजय राऊत यांनी दिलेली माहिती अर्धवट असल्याचे समोर आले आहे. त्र्यंबकेश्वरला काकड आरती होतच नसल्याची माहिती समोर आली आहे

संजय राऊत यांनी दिलेली माहिती अर्धवट असल्याचे समोर आले आहे. त्र्यंबकेश्वरला काकड आरती होतच नसल्याची माहिती समोर आली आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 04 मे : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thckery) यांनी मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यासाठी आक्रमक भूमिका घेती आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी मशिदीवर अजान पठण करण्यात आली नाही. तर शिर्डीत (shirdi) आणि त्र्यंबकेश्वरसह (trimbakeshwar) अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही’ असा दावा करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसेवर टीका केली. पण, शिर्डीत आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रात्री आरती होत असल्याचं समोर आलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून मनसेवर भोंग्यांच्या वादावरून टीका केली होती.

जाहिरात

‘भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तिर्थस्थनावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनूवर्ष भोंग्यांद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते, अशी टीका राऊत यांनी केली होती. ( मनसेच्या ‘भोंग्या’ला मुस्लिम समाजाचं शांततेतून उत्तर, मुंबईत पहिल्यांदाच घडलं! ) पण, संजय राऊत यांनी दिलेली माहिती अर्धवट असल्याचे समोर आले आहे. त्र्यंबकेश्वरला काकड आरती होतच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काकड आरतीपासून भाविक मुकल्याचा संजय राऊत यांचा दावा खोटा ठरत असल्याचे समोर आले आहे. तसंच, त्र्यंबकेश्वरमध्ये केवळ रात्री 8.30च्या दरम्यान शेज आरती केली जाते त्यांनतर मंदिर बंद होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे संजय राऊत आपल्या ट्वीटमुळे ट्रोल होण्याची शक्यता आहे.  या पूर्वी सुद्धा नाशिकमध्येच संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हनुमान चालीसा ऐवजी मारुती स्तोत्र म्हटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात