देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? "उद्धव ठाकरे काय म्हणाले? देवेंद्र फडणीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरीचा ढाचा खाली आला असता. माझ्यावर एवढा विश्वास आहे? मी तुम्हाला सांगतो. कशाला लपवायचं? आज माझं वजन १०२ किलो आहे. जेव्हा बाबरी पाडायला गेलो तेव्हा १२८ होतो. उद्धवजींना ही भाषा नाही समजणार. उद्धवजी तुम्हाला वाटतंय, माझ्या पाठीवर खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करु शकाल. लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडल्याशिवाय थांबणार नाही", असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केला. बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे. उद्धवजी त्याच मैद्याच्या पोत्यावर नाक घासून तुम्ही मुख्यमंत्री झालात. वजनदार लोकांपासून सांभाळून राहा. जितकं वरती वाटतं त्यापेक्षा दप्पट खाली आहे. काल कुणीतरी वाघ म्हणून ट्विट केलं. त्यांना समजवून सांगा, वाघाचा फोटो काढला म्हणून वाघ होता येत नाही. वाघ असेल तर निधळ्या छातीने आव्हानांचा सामना करावा लागतो. तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करुन वाघ होता येत नाही. तुम्ही कुठला सामना केला? कुठल्या संघर्षाला तुम्ही होता? कुठल्याच संघर्षाला नाही. आजही दोन वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो. Alert..! राज्यातल्या 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा उद्धव यांनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धू्र्त आहे, हे खरंच आहे. ज्याला प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा. वाघ हा भोळाच असतो. पण धूर्त कोण असतो? त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण सोडायची नाही. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात. अमित साटम यांनी भ्रष्टाचाराचं पुस्तक छापलं. बाळासाहेब वाघ होतेच. पण आता या देशात एकच वाघ आहे. त्या वाघाचं नाव नरेंद्र मोदी नाव आहे. तुमचं हिंदूत्व हे गदाधारीचं आहे. तु्म्ही म्हणाले आम्हाला लाथ मारली. लाथ गधा मारतो. खरा पहिलवान ठोकर मारतो. लाथ गाढव मारतो. लक्षात ठेवा हा बदललेला भारत आहे. काश्मीरमध्ये आमच्या एका हिंदूची हत्या केली तर २४ तासाच्या आत तीन दहशवाद्यांची हत्या करणारा हा नवा भारत आहे. तुम्ही सवाल विचरण्याचा आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद नरेंद्र मोदींमध्ये आहे. तुमच्याकडे शर्जिल आला, भारत तोडण्याचा बोलला, निघूनही गेला. तुम्ही काय-काय बोलले? एकप्रेमी प्रेमातून अॅसिड फेकतो. आमची संपत्ती घेऊन आणि दुसऱ्या सोबत लग्न केलं. ऑफिशियल घटस्फोट तर द्यायचा. कालचं भाषण सोनिया गांधी यांना समर्पित होतं.उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 16, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Sanjay Raut (Politician), Shivsena