Home /News /agriculture /

Mumbai Monsoon Rain : मुंबईकरांनो सावधान पुढचे 5 दिवस red alert, जनजीवन, रेल्वे सेवा विस्कळीत

Mumbai Monsoon Rain : मुंबईकरांनो सावधान पुढचे 5 दिवस red alert, जनजीवन, रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबईसह, उपनगर आणि दक्षिण कोकणात जोरदार पावसाने हजेरी (Mumbai, thane, dadar heavy rain fall) लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

  मुंबई, 1 जुलै : मुंबईसह, उपनगर आणि दक्षिण कोकणात जोरदार पावसाने हजेरी (Mumbai, thane, dadar heavy rain fall)   लावल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत (Sindhudurg, Ratnagiri, raigad heavy rain) अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई (Mumbai monsoon update) आणि उपनगरासह अनेक जिल्ह्यांत १०० पेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने अतिवृष्टी झाली आहे. (red alert in Mumbai) तर विदर्भातही पावसाच्या सरी कोसळल्या असून, उर्वरित राज्यात पावसाची उघडीप असल्याचे दिसून आले. दरम्यान मुंबईत पुढचे चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच काल मुंबईत पावसाचा orange alert देण्यात आला होता परंतु आज red alert देण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  मागच्या 24 तासांत मुंबई शहर सांताक्रूझ 125, पालघर तलासरी 56, विक्रमगड 42. रायगड अलिबाग 130, माणगाव 64, माथेरान 44, म्हसळा 95, मुरूड 96. श्रीवर्धन 144, सुधागडपाली 80, तळा 146, उरण 70,

  हे ही वाचा : '..तेव्हा युती का तोडली?'; शिवसेनेचा फडणवीसांना सवाल, अटल बिहारींच्या त्या वाक्याची करून दिली आठवण

  काल (दि.30) मुंबई शहर व उपनगरात मुसळधार पावसाने चांगलीच बॅटींग केली. काल सकाळपासून सुरू झाले पाऊस रात्री 8 पर्यंत कोसळत होता, 12 तासात तब्बल 119 मिमी पावसाची नोंद झाली. नेहमीप्रमाणे हिंदमाता, सायन मार्केटसह सखल भागात पाणी तुंबल्याने नागरिकांना या भागात वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावला. सांताक्रूझ येथे सिग्नलमध्ये बिघाड तर परेल स्टेशन जवळ रेल्वे मार्गात पाणी आल्यामुळे रात्री 9 नंतर मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती.

  मुंबई शहर व उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून पडलेल्या पावसाच्या जोरदार सरीमुळे शहर विभागातील हिंदमाता व सायन गांधी मार्केटसह सुमारे 15 ते 20 ठिकाणी सकल भागात पाणी तुंबले. पश्चिम व पूर्व उपनगरातही मिलन, अंधेरी सबवे, बांद्रा पवई, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी सखल भागात काही प्रमाणात पाणी तुंबले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मात्र पालिकेने सखल भागातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा पंपाद्वारे निचरा करण्यात आला.

  हे ही वाचा : ठाकरेंना धक्का! मेट्रो कारशेड आरेतच; फडणवीसांचा पहिला आदेश

  पावसाच्या संताधारणामुळे रस्त्यावरील वाहनांचा वेगही मंदावला. त्यामुळे संध्याकाळी मुंबई शहराकडून उपनगरात जाणारे सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. चर्चगेट ते ऑपेरा हाऊसपर्यंत जाणाऱ्या महर्षी कर्वे रोडवर ऑपेरा हाऊस ते चर्चगेट पर्यंत वाहनांची रांग लागली होती. राणीबाग ते सायन डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड, लिंक रोड, बांद्रा लिंक रोड, एस. व्ही. रोड, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गावरही वाहतूक कोंडी होती.

  100 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे : देवगड 184, मालवण 112, कुडाळ 111, (जि. सिंधुदुर्ग), तळा 146, श्रीवर्धन 144, अलिबाग 130, (जि. रायगड), लांजा 145, हर्णे 105, रत्नागिरी 104, (जि. रत्नागिरी)मिमी पावसाची नोंद झाली.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Monsoon, Mumbai, Mumbai rain, Raigad news, Rain fall, Weather forecast, Weather update, Weather warnings

  पुढील बातम्या