Home /News /maharashtra /

"शिवसेनेचं खच्चीकरण अन् राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काहींची छुपी नीती" आमदार योगेश कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

"शिवसेनेचं खच्चीकरण अन् राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काहींची छुपी नीती" आमदार योगेश कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

"शिवसेनेचं खच्चीकरण अन् राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काहींची छुपी नीती" आमदार योगेश कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

"शिवसेनेचं खच्चीकरण अन् राष्ट्रवादीचं बळ वाढवण्याची काहींची छुपी नीती" आमदार योगेश कदमांचा शिवसेनेला घरचा आहेर

दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला असला तरी सर्वाधिक जागा या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. यावरुनच शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

    शिवाजी गोरे, प्रतिनिधी दापोली, 20 जानेवारी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत निवडणुकीची (Dapoli Nagar Panchayat election) जबाबदारी शिवसेनेने पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर सोपवली होती. या निवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) 6 जागांवर विजय मिळवला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सर्वाधिक म्हणजेच 8 जागांवर विजय मिळवला आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) यांनी आपल्या मनातील सल बोलून दाखवत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काय म्हणाले आमदार योगेश कदम? आमदार योगेश कदम यांनी म्हटलं, माझं म्हणणं असं होतं की महाविकास आघाडी करायची असेल तर ज्याची ताकद आज असेल तशाप्रमाणे जागावाटप झालं पाहिजे, तसं असतं तर मला महाविकास आघाडी मान्य होती पण तसं झालं नाही. शिवसेनेचं खच्चीकरण करायचं राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं ही छुपी नीती दुर्दैवाने आमच्या काही नेत्यांची होती. ही दुर्दैवाने दापोलीत झाली. आता घडलं काय, की 5 वर्षे ज्या शिवसेनेची सत्ता दापोली नगरपंचायतीकडे होती त्या शिवसेनेकडे सत्ता नसून राष्ट्रवादीकडे गेली आहे. फायदा कुणाचा झाला आहे तर राष्ट्रवादीचा झाला आहे. वाचा : दापोलीत अनिल परब आणि उदय सामंतांचा करिश्मा रामदास भाई आणि मी पूर्णपणे या निवडणुकीपासून अलिप्त होतो, प्रचारामध्ये आम्ही कुठेही सहभाग घेतला नाही. मंडणगडमध्ये जे शिवसैनिक अपक्ष म्हणून उभे राहिले ते 8 जण निवडून आले. मंडणगडध्ये शिवसेनेचाच नगराध्यक्ष बसेल हा विश्वास आहे असंही आमदार योगेश कदम यांनी म्हटलं आहे. दापोलीत काय घडलं नेमकं? दापोली नगरपंचायत निवडणुकीत (Dapoli Nagar Panchayat Election) शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वादात दापोली नगरपंचायत अतिशय अटीतटीची बनली होती. या नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब विरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Former Minister Ramdas Kadam) यांची या निवडणुकीत ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे या नगरपंचायतीचे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निकालातून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena - NCP) यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. वाचा : नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर धुळ्यात दोन गटांत जोरदार राडा दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु मंडणगड नगरपंचायत शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. रामदास कदम समर्थकांच्या शिव सेवा विकास आघाडीला सात जागा मिळाल्याने या ठिकाणी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना चांगलेच धोबीपछाड केले आहे. त्यामुळे दोन्ही नगरपंचायत शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी बाजी मारली आहे. दापोली नगरपंचायतीचे निकाल दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असून 17 पैकी 14 ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Dapoli, Ratnagiri, Shiv sena

    पुढील बातम्या