शिवाजी गोरे, प्रतिनिधी
दापोली, 19 जानेवारी : दापोली नगरपंचायत निवडणुकीत (Dapoli Nagar Panchayat Election) रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या गटाची सरशी झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन नेत्यांच्या वादात दापोली नगरपंचायत अतिशय अटीतटीची बनली होती. या नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब विरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Former Minister Ramdas Kadam) यांची या निवडणुकीत ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती, दोन्ही नेत्यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे या नगरपंचायतीचे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आज झालेल्या निकालातून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena - NCP) यांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना धोबीपछाड केले आहे.
दापोली नगरपंचायतीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. परंतु मंडणगड नगरपंचायत शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. रामदास कदम समर्थकांच्या शिव सेवा विकास आघाडीला सात जागा मिळाल्याने या ठिकाणी माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना चांगलेच धोबीपछाड केले आहे. त्यामुळे दोन्ही नगरपंचायत शिवसेनेच्या दोन्ही नेत्यांनी बाजी मारली आहे.
दापोली नगरपंचायतीवर अनिल परब यांचे वर्चस्व राहिले आहे तर मंडणगड नगरपंचायती आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम समर्थकांच्या शिवसेना बंडखोर शिवसेवा विकास आघाडीला सात जागा मिळाल्याने या ठिकाणी रामदास कदम यांचा वरचष्मा निर्माण झाला आहे. परंतु राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीला सात जागा आणि रामदास कदम समर्थक शिवसेना बंडखोर स्वविकास आघाडीला सात जागा व अपक्षांना तीन जागा मिळाल्या. त्यामुळे मंडणगड नगर पंचायतीमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आहेत. त्यामुळे अपक्ष कोणाची सत्ता स्थापन करण्याला मदत करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु दोन्ही नेत्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेल्या या दोन्ही नगरपंचायतीमध्ये प्रत्येकी एका ठिकाणी वरचष्मा दाखविण्यात यश आले आहे.
दापोली नगरपंचायतीचे निकाल
दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळाले असून 17 पैकी 14 ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपला केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला तर शिवसेना बंडखोर रामदास कदम समर्थकांना केवळ दोन जागा मिळवता आल्या आहेत.
वाचा : अब्दुल सत्तारांचा दानवेंना 'जोर का झटका', सोयगाव नगरपंचायत शिवसेनेच्या खिशात
एकुण जागा-17
भाजप- 1
शिवसेना- 6
काँग्रेस-0
राष्ट्रवादी- 8
इतर(अपक्ष)- 2
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil parab, Dapoli, Election, NCP, Ramdas kadam, Shiv sena