मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते', शिवसेना आमदारांचे वक्तव्य

'कोरोनाचे जंतू सापडले असते, तर देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते', शिवसेना आमदारांचे वक्तव्य

कोरोनाच्या विरोधातील या लढ्यात सर्वांनी एकत्रितपणे संकटाचा सामना करण्याची गरज असताना सत्ताधारी पक्षाचे आमदारच अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कोरोनाच्या विरोधातील या लढ्यात सर्वांनी एकत्रितपणे संकटाचा सामना करण्याची गरज असताना सत्ताधारी पक्षाचे आमदारच अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कोरोनाच्या विरोधातील या लढ्यात सर्वांनी एकत्रितपणे संकटाचा सामना करण्याची गरज असताना सत्ताधारी पक्षाचे आमदारच अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मुंबई, 18 एप्रिल : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. बुलडाण्याचे आमदार असलेले संजय गायकवाड म्हणाले की, मला जर कोरोनाचे जंतू मिळाले असते तर ते मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबले असते.

राज्यात सध्या कोरोनाचा मोठा संसर्ग पसरला असून, रेमडेसिविर, ऑक्सिजन याच्या तुटवड्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच शिवसेना आमदारांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

(वाचा-राष्ट्रवादी Vs भाजप, चंद्रकांत पाटलांनी कडक शब्दांत नवाब मलिक यांना दिला इशारा)

काय म्हणाले गायकवाड?

संजय गायकवाड यांनी केंद्रातील सरकारवर टीका करताना अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. तुमच्या सरकारमुळं लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले असते. अशा प्रकारचं आक्षेपार्ह वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप पाहायला मिळत आहे. मात्र त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे तो महाराष्ट्राला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात यावरून तणाव वाढला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेलेया शिवसेनेचे आमदार अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विरोधातील या लढ्यात सर्वांनी एकत्रितपणे संकटाचा सामना करण्याची गरज असताना सत्ताधारी पक्षाचे आमदारच अशा प्रकारच्या भाषेचा वापर करत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

(वाचा -कोरोनाची दुसरी लाट ठरतीये घातक, 1 ते 5 वयोगटातील बालकांमध्ये वाढला संसर्ग)

राज्यात शनिवारी कोरोनाचे आजवरचे सर्वाधिक 67,123 रुग्ण आढळले. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 37,70,707 झाला. तर मृतांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 59,970 झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Devendra Fadnavis, Shivsena