मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'मला अजितदादांचा फोन आला', शिवसेना आमदाराची जाहीर व्यासपीठावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर स्तुतीसुमने

'मला अजितदादांचा फोन आला', शिवसेना आमदाराची जाहीर व्यासपीठावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर स्तुतीसुमने

भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.

चिपळूण, 14 ऑक्टोबर : चिपळुणातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी दोघांनीही भाषणं केली. तसंच या दोन्ही नेत्यांनी केलेली भाषणे ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

सुरुवातीला भाषण करताना भास्कर जाधव यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळत राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. तसंच दादांचा मला फोनही आल्याचं सांगत मतदार संघातील विकास कामाच्या बाबतीत त्यांच्यासोबत चर्चाही केल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

तटकरेंच्या कोपरखळ्या

भास्कर जाधव यांच्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेले भाषणही लक्षवेधी ठरले. मी यापुढे भास्कर जाधव यांच्यावर टीका करणार नाही, असं स्पष्ट करत आपण दोघांनीही हे पाळूया असे तटकरे म्हणाले. पण भास्कर जाधव यांच्या स्वभावामुळे ते शब्द पाळतील की नाही याबद्दल मात्र भीती आहे, असा टोलाही यावेळी सुनिल तटकरे यांनी लगावला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी मंत्रिपदाच्या अपेक्षेने भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मात्र निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करताच शिवसेनेनं भास्कर जाधव यांचा अपेक्षाभंग करत त्यांना डावललं. त्यामुळे नाराज झालेल्या भास्कर जाधव यांनी थेट पक्षाच्या नेतृत्वावरच आगपाखड केली होती. या पार्श्वभूमीवर जाधव यांची पुन्हा राष्ट्रवादीशी जवळीक वाढत आहे की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

First published:
top videos

    Tags: Ajit pawar, Bhaskar jadhav, Sharad pawar