मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनलाही मागे टाकू शकतो महाराष्ट्र

मोठी बातमी! कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत चीनलाही मागे टाकू शकतो महाराष्ट्र

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

देशभरात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

  • Published by:  Sandip Parolekar
नवी दिल्ली, 6 जून: देशभरात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2 लाख 36 हजार 657 झाली आहे. रुग्णांच्या संख्येत भारताताने आता इटलीला पछाडले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत जगात चौथे क्रमांकावर पोहोचला आहे. हेही वाचा.. अपघातातील जखमी तरुणांवर रुग्णालयांत झाला नाही उपचार, अखेर तडफडत सोडला प्राण! गेल्या 24 तासांत देशात एकूण 9887 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आता एकूण रुग्णांच्या बाबतीत चीनलाही मागे टाकणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 80 हजारांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2436 नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी तर महाराष्ट्रात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 80229 झाली आहे. पुढील दोन- तीन दिवसांत महाराष्ट्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबत चीनला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 83030 आहे. चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत 4634 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकडेवारीतही महाराष्ट्र काही दिवसांत चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाने 2849 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाच्या संक्रमणास सुरूवात झाली होती. हेही वाचा..कारचा भीषण अपघात, भाजप नगरसेवकाच्या पुत्रासह दोघांचा जागेवरच मृत्यू तर एक गंभीर दिलासादायक बाब म्हणजे महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचा प्रमाण (Recovery Rate) 43.81 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.55 टक्के आहे. आतापर्यंत 35156 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 1368 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 41986 एकूण अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
First published:

Tags: Corona, Coronavirus

पुढील बातम्या