मुंबई, 14 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिनं काल राज्यपाल यांची भेट घेतली. एवढंच नाही तर तिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोपही केले. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना प्रवक्ते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी कंगनाला तीव्र शब्दांत सुनावलं आहे. कंगनाला मुंबई पाकव्याप्त काश्मीर (POK)वाटत असेल तर तिनं योग्य वाटत असेल तिथं राहावं. कंगनानं आपला बोरा बिस्तर गुंडाळावा. मुंबईबद्दल वाईट बोलत असेल आम्ही ऐकून घेणार नाही. कंगनाचं आपलं बस्तान उचलावं हेच योग्य ठरेल, अशा शब्दांत अनिल परब यांनी इशारा दिला आहे.
हेही वाचा...महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना जोडले हात, काय म्हणाल्या...पाहा VIDEO
अनिल परब म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फक्तं कंगनालाच का भेटावं, मुंबईत इतरही गरीबांची अनधिकृत बांधकामं पडत आहेत. त्यामुळे राज्यपालांनी या गरीबांनाही भेटलं पाहिजे, अशा टोला देखील लगावला. बेकादेशीर काम करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असत असतील, तर फक्त कंगनाला का भेटता? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं, असंही परब यांनी यावेळी सांगितलं.
कंगनाचं बांधकाम तुटल्यावर इतका पोटशूळ का? मर्यादा दोन्ही बाजूंनी पाळाव्यात. कोणी काही बोलले, दैवताला बोलले असेल आणि सत्तेत बसलोय म्हणून आम्ही बोलायचं नाही का? बाळासाहेबांनी हे शिकवलं नाही. नौसेना अधिकारी आहे म्हणून संयम तोडण्याचा अधिकार कुणी दिला? अशा अनेक प्रश्नांनीही अनिल परब यांनी हात हातला. मात्र, शिवसैनिकांची उत्स्फर्त प्रतिक्रिया होती ही, असं सांगत नौसेना अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रश्नाला बगल दिली.
मातोश्री आमचं देऊळ..
आमच्या मुख्यमंत्र्यांना जर का कोणी बोलत असेल. आमच्या दैवतावर कोणी बोलत असेल तर आमच्या शिवसैनिकांनी उत्स्फूर्द प्रतिक्रिया दिली. शिवसेनेत 'मातोश्री' आमचं देऊळ आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपापली मर्यादा जपली पाहिजे, असही अनिल परब यावेळी म्हणाले.
आणखी काय म्हणाले अनिल परब...?
-रामदास आठवले हे अर्धै शटर बंद झालेले दुकान आहे
- चीन हेरगिरीबाबत केंद्रानं विचार करावा, परंतु त्यांचे लक्ष प्रत्येक राज्यात सत्ता आणण्याचे आहे
- मराठा आरक्षणासंदर्भात आलेला निर्णय अनपेक्षित आहे. आंदोलन करून काही फायदा होणार नाही, सरकार तुमच्यासोबतच आहे.2-3 दिवसांत सीएम निर्णय घेतील
-ठाकरे ब्रँडला पर्याय नाही राज्यात. त्याला विरोधकांनाकडून धक्का लावण्याचे प्रयत्न आहेत. पण हा ब्रँड भक्कम आहे. त्यांचे नाव ठाकरे असल्यानं साद घातली. तावड़े,परब आडनाव नाही ना.
- सेनेची पाळेमुळं उखडता येणार नाहीत कुणाला.
- 105 आमदार असूनही हे सीएम होता आलं नाही याचे नैराश्य आहे त्यांचे. त्यामुळं राज्याची बदनामी केली जातंय.
- कंगनाची पर्सनॅलिटी स्प्लिस्ट पर्सनॅलिटी आहे. तिला डॉक्टरांची गरज आहे. हवंतर सेना डॉक्टरांची कुमक पाठवेल.अशा अनेक कंगना आल्या आणि गेल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.