Home /News /maharashtra /

महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना जोडले हात, काय म्हणाल्या...पाहा VIDEO

महापौर किशोरी पेडणेकरांनी मुंबईकरांना जोडले हात, काय म्हणाल्या...पाहा VIDEO

'मास्क न वापरता घराबाहेर पडू नका. माझंच पाहा, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मला कोरोनाचा विळखा पडला

मुंबई, 14 सप्टेंबर: मास्क न वापरणाऱ्या तसेच विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसमोर अक्षरश: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हात जोडले आहेत. महापौर किशोरी पेडणेकर सध्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा...कोल्हापुरात होणार गोलमेज परिषद, 48 खासदारांसह 181 आमदारांचे पुतळे जाळणार 'मास्क न वापरता घराबाहेर पडू नका. माझंच पाहा, माझ्याकडून नक्की काहीतरी चूक झाली असेल. म्हणून मला कोरोनाचा विळखा पडला. तुम्ही मात्र असं करू नका. कुठेही जा, बाजरात जा पण मास्क घाला. विनाकारण घराबाहेर पडू नका.', असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट हॉस्पिटलच्या बेडवरून केलं आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कोविड 19 हॉस्पिटलची स्वत: सातत्याने पाहाणी करणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. किशोरी पेडणेकर यांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचेही स्वॅब टेस्ट घेण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांचे वय- 58 वर्षे आहे. त्यामुळे त्यांना अधिक काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांना बीएमसीच्या सेव्हन हिल्स या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्याची शक्यताही सांगितली जात आहे. थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू गेल्या काही दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकर यांचे थोरले बंधू सुनिल कदम यांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. सुनिल कदम यांच्यावर महापालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली होती. तसं पाहिलं तर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरी चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी होत असल्याचं स्पष्ट झाल्यानं चिंता वाढली आहे. मुंबईसह राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हेही वाचा...मोठी बातमी! मराठा संघटना आक्रमक होण्याच्या तयारीत, पोलिसांनी बजावली नोटीस महापौर यापूर्वी झाल्या होत्या 'होम क्वारंटाईन' दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात महापौर किशोरी पेडणेकर या देखील होम क्वारंटाइन झाल्या होत्या. BMCच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केलं होतं. महापौर किशोरी पेडणेकर या 14 दिवस घरीच होत्या. महापौर किशोरी पेडणेकर काही पत्रकारांच्या संपर्कात आल्या होत्या.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine

पुढील बातम्या