मुंबई, 13 ऑगस्ट : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हा विधान परिषदेच्या सदस्यत्वाचादेखील राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं होतं. पण उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात विधान परिषदेच्या सभापतींकडे आमदारकीचा राजीनामा दिला नव्हता. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आपल्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाच्या म्हणजेच आमदारकीचा राजीनामा देणार नाहीत. विधान परीषदेत शिवसेनेचं संख्याबळ कमी होऊ नये म्हणून शिवसेना पक्ष कार्यकारणीने हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना आपण विधान परीषद आमदारकीच्या राजीनाम्याचीही घोषणा केली होती. त्यांनी त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पत्रही दिले होते. मात्र विधान परीषद सदस्याचा राजीनामा हा विधान परीषद सभापतींकडे द्यावा लागतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा राजीनामा ग्राह्य धरला गेला नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे विधान परीषद आमदार म्हणून कार्यरत आहेत. विधानपरिषदेचं संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर आमदारकीचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
(आर आर पाटलांचा मुलगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, चर्चांना उधाण)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.