मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उद्धव ठाकरेंविरुद्ध लिखाण केल्याचा राग, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर केली दगडफेक

उद्धव ठाकरेंविरुद्ध लिखाण केल्याचा राग, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर केली दगडफेक

शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे व इतर 10 जणांनी दैनिक लोकाशा कार्यालयावर हल्ला करत दगडफेक केली आहे.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे व इतर 10 जणांनी दैनिक लोकाशा कार्यालयावर हल्ला करत दगडफेक केली आहे.

शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे व इतर 10 जणांनी दैनिक लोकाशा कार्यालयावर हल्ला करत दगडफेक केली आहे.

बीड, 6 मार्च : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याविषयी लिखाण केल्याचा राग मनात ठेवून बीड जिल्ह्यातील शिवसेना (Beed Shivsena) पदाधिकाऱ्यांनी कायदा हातात घेतला आहे. शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुशील पिंगळे व इतर 10 जणांनी दैनिक लोकाशा कार्यालयावर हल्ला करत दगडफेक केली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी सदर वृत्तपत्राच्या संपादकाला जीवे मारण्याची धमकी देत गाडी जाळण्याचा इशाराही देण्यात आला. याबाबत बीड शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वृत्तपत्राच्या कार्यालयावर केलेल्या या दगडफेकीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

संबंधित आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडण्यासंदर्भात केलेल्या विधानाचे विश्लेषण दैनिक लोकाशा या स्थानिक दैनिकाच्या 'क्रॉस लाईन' या सदरामध्ये करण्यात आले होते. यामध्ये अधिवेशनात बाबर यासोबतच रामाच्या रॉयल्टीसाठी ठाकरेंचा रिक्षा कबरीत, असा उल्लेख करण्यात आला होता.

हेही वाचा - नाशिकमध्ये मनसेसोबत युती करणार का? गिरीश महाजनांनी दिले उत्तर

यावर आक्षेप घेत आज सुशील पिंगळे यांनी लोकाशा कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड केली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. घडलेल्या प्रकारासंदर्भात सदर वृत्तपत्राचे उपसंपादक भागवत तावरे यांनी माहिती दिली आहे.

दरम्यान, राज्यात सत्ताधारी असणाऱ्या पक्षाचे कार्यकर्तेच कायदा हातात घेत असतील तर नागरिकांच्या सुरक्षिततेचं काय, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Shivsena