जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पालकमंत्री हटाव, आदिती तटकरेंविरोधात शिवसेना आक्रमक, रायगडच्या राजकारणात नेमकं काय चाललंय?

पालकमंत्री हटाव, आदिती तटकरेंविरोधात शिवसेना आक्रमक, रायगडच्या राजकारणात नेमकं काय चाललंय?

पालकमंत्री हटाव, आदिती तटकरेंविरोधात शिवसेना आक्रमक, रायगडच्या राजकारणात नेमकं काय चाललंय?

रायगडमध्ये शिवसेनेच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असलेल्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रायगड, 17 फेब्रुवारी : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (Maha Vikas Aghadi Government) आहे. मात्र या महाविकास आघाडीत धुसफूस असल्याची पुन्हा एक बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस मंत्री (Congress Minister) निधी कमी मिळत असल्याने नाराज असल्याची नुकतीच बातमी समोर आली होती. त्यानंतर आता शिवसेनेतीलही काही आमदार (ShivSena MLAs) निधीवरुन नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रायगडमध्ये (Raigad) शिवसेनेच्या तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या असलेल्या पालकमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. त्यांनी आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरुन हटवा, अशी मागणीच केली आहे. विशेष म्हणजे याच मागणीसाठी आज शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची आलिबागमध्ये (Alibaug) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेनेचे तीनही आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना या मागणीबाबत पत्र लिहितील, त्यानंतर प्रत्यक्ष भेटतील, अशी माहिती समोर आली आहे. नेमकं प्रकरण काय? रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झालीय. पालकमंत्री आदिती तटकरे या विकासकामांच्या निधी वाटपात भेदभाव करीत आहेत, तसेच प्रत्येक विकासकामात श्रेय घेत असल्याचा आरोप आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे आदिती तटकरे यांना पालकमंत्री पदावरुन पायउतार करण्यात यावे, अशी मागणी या तीनही आमदारांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबागमध्ये शिवसेनेची जिल्हास्तरीय बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने पालकमंत्री हटावचा नारा दिला. जिल्ह्यात स्वाक्षरी मोहीम राबवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याची भूमिका शिवसेनेच्या तीनही आमदारांनी मांडली आहे. ( देशातील सर्वात तरुण महापौर आणि सर्वात तरुण आमदारांचं जुळलं सूत, अडकणार लग्नबेडीत ) शिवसेना आमदारांची नेमकी तक्रार काय? पालकमंत्री कोणत्याही आमदाराला घेऊन चालत नाहीत. निधी देत नाहीत. विकासकामांच्या उद्घाटनाचा किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे शिवसेनेच्या तीन आमदारांना योग्य सन्मान दिला जात नाही, अशी त्यांची तक्रार आहे. याशिवाय जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे. मग पालकमंत्रीपद शिवसेनेच्या कोणत्यातरी एका आमदाराकडे देण्यात यावे, अशी मागणी सर्व शिवसैनिकांची आहे. रायगड जिल्ह्यात शिवेसेनेचे तीन आमदार आहेत. पण तीनही आमदारांच्या निधीबाबत तक्रारी आहेत. विकास कामांसाठी आपल्याला पालकमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. तीनही आमदार पुढच्या दोन दिवसांमध्ये पालकमंत्री हटावची मगणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार आहेत. या पत्रामध्ये सर्व शिवसैनिकांच्या स्वाक्षरी असणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात