मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाताळ आणि न्यू ईयरला शिर्डीचा प्लान करताय? आधी ही नवी नियमावली वाचा..

नाताळ आणि न्यू ईयरला शिर्डीचा प्लान करताय? आधी ही नवी नियमावली वाचा..

कोरोनाचे पार्श्‍वभूमीवर दर्शनरांगेत क्षमतेपेक्षा जास्‍त गर्दी झाल्‍यास परिस्थिती विचारात घेऊन नाईलाजास्‍तव दर्शन व्‍यवस्‍था बंद ठेवण्‍यात येईल.

कोरोनाचे पार्श्‍वभूमीवर दर्शनरांगेत क्षमतेपेक्षा जास्‍त गर्दी झाल्‍यास परिस्थिती विचारात घेऊन नाईलाजास्‍तव दर्शन व्‍यवस्‍था बंद ठेवण्‍यात येईल.

कोरोनाचे पार्श्‍वभूमीवर दर्शनरांगेत क्षमतेपेक्षा जास्‍त गर्दी झाल्‍यास परिस्थिती विचारात घेऊन नाईलाजास्‍तव दर्शन व्‍यवस्‍था बंद ठेवण्‍यात येईल.

शिर्डी, 20 डिसेंबर: नाताळ (Christmas) आणि न्यू ईयर (New year-2021) जवळ आलं आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे . शिर्डीत साईबाबांच्या (Saibaba Shirdi) दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर संस्थानने (shirdi Saibaba sansthan) नवी नियमावली जाहीर केली आहे. साईबाबांचं ऑनलाईन दर्शनपास घेणं अनिवार्य करण्यात आलं आहे. दर्शनपास नसल्या भाविकांना मात्र, शिर्डीत गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. हेही वाचा... भाजप आमदारानंच मोडला नियम! राम सातपुतेंच्या शाही विवाह सोहळ्यात गर्दी मावेना साईबाबांच्या भक्तांसाठी खूशखबर! सुरूवातीला 6000 भाविकांनाच दर्शन दिले जात होते मात्र आता नाताळ सुट्टी आणी नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता दररोज 12000 भाविकांना दर्शन दिल जाणार आहे. साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्थांनी नाताळ आणि न्यू ईयरची वाढती गर्दी लक्षात घेतला नवी नियमाली जाहीर केली आहे. शासनानं कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन गर्दीचे काळात जास्‍तीत जास्‍त 12000 साईभक्‍तांना दर्शनास प्रवेश देणे मंदिर प्रशासनास शक्‍य होणार आहे. साईभक्‍तांच्‍या गर्दीचा ओघ असाच कायम राहिल्‍यास सलग सुट्टीचे काळात आलेल्‍या सर्व साईभक्‍तांना साईबाबांचे दर्शन उपलब्‍ध करुन देणे शक्‍य होणार नाही. पर्यायाने कोणत्‍याही पूर्व नियोजनाशिवाय क्षमतेपेक्षा जास्‍त भक्‍तगण शिर्डीस आल्‍यास मोफत दर्शनपास वितरण काऊंटर तसेच दर्शन रांगेत गर्दी वाढून अभुतपूर्व परिस्थिती उद्भवू शकते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर साईभक्‍तांसाठी संस्थानतर्फे काही उपाययोजना करण्यास सांगण्यात आलं आहे. त्याच बरोबर महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. संस्‍थान प्रशासन आपले सोईसाठी सुलभ दर्शनव्‍यवस्‍था करण्‍याचा अटोकाट प्रयत्‍न करत आहे. सर्वांनी सुचनांचे पालन करुन सहकार्य करणे अपेक्षीत आहे. कोरोनाचे पार्श्‍वभूमीवर दर्शनरांगेत क्षमतेपेक्षा जास्‍त गर्दी झाल्‍यास परिस्थिती विचारात घेऊन नाईलाजास्‍तव दर्शन व्‍यवस्‍था बंद ठेवण्‍यात येईल. 10 वर्षाच्‍या आतील मुले व 65 वर्षापेक्षा जास्‍त वयाच्‍या व्‍यक्‍तींनी दर्शनासाठी येण्‍याचे टाळावे. निवासव्‍यवस्‍था मर्यादित असल्‍यामुळे संस्‍थानचे निवासस्‍थानांमध्‍ये रुम घेऊ इच्छिणाऱ्या भक्‍तांनी online.sai.org.in या वेबसाईटव्‍दारे रुमचे आगाऊ बुकींग करुनच निवासव्‍यवस्‍थेचा लाभ घ्‍यावा, त्याच बरोबर दर्शनपासचे उपलब्‍धतेबाबत प्रकटन दररोज तारीखनिहाय वेळोवेळी मंदिराचे सर्व प्रवेशव्‍दारांवर, सर्व भक्‍तनिवास, वेबसाईट, वृत्‍तपत्रे व वृत्‍तवाहीन्‍यांवर प्रकाशित करणे येईल. हेही वाचा...देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांशी आमचे कितीही मतभेद असले तरी... online.sai.org.in या वेबसाईटव्‍दारे दर्शनपास आरक्षण करतेवेळी साईभक्‍तास स्‍वतःचा ओळखपत्र संगणक (online) प्रणालीमध्‍ये अपलोड करणे बंधनकारक आहे. दर्शनासाठी येतांना साईभक्‍तांना सोबत फोटो ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील. दर्शनासाठी आलेल्‍या साईभक्‍तांना ओळखपत्र पडताळणी अंती दर्शनपास वरील नमुद वेळेतच दर्शनासाठी प्रवेश देण्यात येईल. यात कोणतीही तडजोड करता येणार नाही.
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra, Shirdi, Shirdi (City/Town/Village)

पुढील बातम्या