राहुल खंदारे, बुलडाणा 26 नोव्हेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह 40 शिवसेना आणि 10 अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत बंडखोरी केली. यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. या सत्तांतराला आता जवळपास 5 महिने झाले आहेत. मात्र, अजूनही शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडना दिसत नाहीत.
आता पुन्हा एकदा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मूर्खांचा बाजार भरला आहे, अशी जहरी टीका खासदार जाधव यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटात सर्व उपरे लोक भरले आहेत. त्यामुळे चांगली लोकं हळूहळू दूर जातील, असा टोला खासदार प्रतापराव जाधव यांनी लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत महिलांचा एक गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर देखील शिंदे गटात सामील झालेले खासदार प्रतापराव जाधव यांनी सडकून टीका केली आहे. ज्या ठिकाणी मुर्खांचा बाजार भरतो, त्या ठिकाणी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही. आता तिथे सर्व उपरे लोक भरले आहेत, असं खासदार जाधव म्हणालेत.
वरळीच्या रणांगणात काका-पुतण्याचा सामना, आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी मनसेची फिल्डिंग!
उद्धव ठाकरेंचं आमदार शिंदे गटात येणार -
याआधीही नुकतंच प्रतापराव जाधव यांनी असा दावा केला होता, की ठाकरे गटातील उरलेल्या 15 आमदारांपैकी आठ आमदार शिंदे गटात येतील. यासोबतच ठाकरे गटातील उर्वरित पाचपैकी तीन खासदारही शिंदेंसोबत येतील, असंही ते म्हणाले होते. अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांच्या स्थानिक पातळीवरील काही वैयक्तिक अडचणी आहेत. त्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवरचे व्यक्तिगत प्रश्न असल्याने ते तिकडे थांबले आहेत, असं जाधव म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.