ठाणे, 16 डिसेंबर : डोंबिवली नंतर आता ठाणे शहर बंदची हाक देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने ही ठाणे शहर बंदची हाक दिली आहे. वारकरी आणि हिंदूत्ववादी संघटनांना आमचा पुर्ण पाठिंबा आहे. “सतांचा अपमान सहन केला जाणार नाही” तसेच हा “बंद यशस्वी पार पडेल”, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. डोंबिवली बंदला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा पुर्ण पाठिंबा महापुरुषांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणे, हे आम्ही कधीही खुपसून घेणार नाही. यामुळे वारकरी संघटना आणि हिंदूत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या डोंबिवली बंदला आमचा पुर्ण पाठिंबा आहे, असे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्या निघणारा महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे अस्तित्वाचा मोर्चा आहे. कारण, पायाला भिंगरी लावून शिंदे फडणवीस सरकार काम करत आहे. म्हणून भविष्यात आपले अस्तित्व राहिलं की नाही, यासाठी महाविकास आघाडी उद्या मोर्चा काढत आहे, अशी टीका खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केली. महाविकास आघाडीचा महामोर्चा निघणार महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानं आणि प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. उद्या शनिवारी हा मोर्चा निघणार आहे, पण अजूनही पोलिसांनी या मोर्चाला परवानगी दिली नाही. पण, सुत्रांच्या माहितीनुसार, काही अटी शर्थींसह या मोर्चाला परवानगी देण्यास पोलिसांनी होकार दिला आहे. हेही वाचा - भारत जोडो यात्रेला 100 दिवसपूर्ण, राहुल गांधींनी काय कमावलं, काय गमावलं? महाविकास आघाडीकडून उद्या 17 डिसेंबर रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या मविआ मोर्च्याला पोलिसांचा ग्रीन सिग्नल मिळाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही अटी आणि शर्टींवर परवानगी दिली जाणार आहे. महाविकास आघाडीचे नेते भाई जगताप, नरेंद्र राणे आणि पांडुरंग सपकाळ यांच्यासोबत पोलीस अधिकारी अटी आणि शर्तीवर चर्चा करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.