शीतल आमटेंच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांसमोर उभं राहिलं मोठं आव्हान

शीतल आमटेंच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोलिसांसमोर उभं राहिलं मोठं आव्हान

डॉ. शीतल आमटे यांनी रेटिना पासवर्ड ठेवल्यामुळे मोठी अडचण झाली आहे.

  • Share this:

नागपूर, 4 डिसेंबर: आनंदवन (जि. चंद्रपूर) (aanandvan, Dist-Chandrapur) कुष्ठरोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे (sheetal amte suicide case) यांच्या मृत्यू प्रकरणाने आता वेगळं वळण घेतलं आहे.

डॉ. शीतल यांचा लॅपटॉप-टॅब-मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मात्र डॉ. शीतल आमटे यांनी रेटिना पासवर्ड ठेवल्यामुळे मोठी अडचण झाली आहे. मोबाईल, लॅपटॉपचे पासवर्ड शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

हेही वाचा...शीतल आमटे यांच्या मृत्यूचे कारण लवकरच कळणार, 'या' रिपोर्टमधून होणार खुलासा

डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाईल नागपूर सायबर सेलनं ताब्यात घेतले होते. डॉ. शीतल यांनी काही दिवसांपूर्वीच गॅजेटचे पासवर्ड बदलले होते. त्यांनी मोबाईलला रेटिना पासवर्ड ठेवला होता. त्यामुळे मोबाईल जोपर्यत त्यांचे डोळे स्कॅन करणार नाही, तोपर्यत तो उघडणार नाही, अशी माहिती मिळाली आहे. पासवर्ड शोधण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता लॅपटॉप आणि मोबाईल नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार आहेत.

दुसरीकडे, डॉ. शीतल यांच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. शीतल आमटे यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचा खुलासा हा मोस्टमार्टम रिपोर्टमधून होऊ शकला नाही. त्यामुळे आता त्याच्या मृतदेहाचं रासायनिक पृथक्करण करण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर (chemical analysis report) नेमकं कारण समोर येणार आहे. त्यामुळे हा अहवाल कधी येतो, हे पुढील पोलीस तपासाची दिशा ठरवणार आहे.

पोलिसांनी आतापर्यंत डॉ. शीतल यांच्याशी नजीकच्या काळात संवाद झालेल्या 90 टक्के लोकांशी चौकशी पूर्ण केली आहे. डॉ. शीतल यांचे निकटचे नोकर, घरगुती मदतनीस यांची चौकशी पूर्ण झाली आहे. डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झालं आहे. त्यांनी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली असून याच स्थळी उलटी झालेले कापड देखील पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांनी नेमके कोणते विष घेतले याबाबत पोस्टमोर्टमच्या रासायनिक अहवालात स्पष्ट होणार असल्याची माहिती आहे. वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती असून हे विष त्यांनी कुठून मिळविले याचा तपास करणे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.

3 दिवसांच्या मौनानंतर आमटे कुटुंबाने कथित डॉ. शीतल यांचे सासू-सासरे असलेल्या करजगी दाम्पत्याने फेसबुकवर टाकून डिलिट केलेल्या प्रतिक्रियेवर पहिल्यांदाच आपलं मनोगत व्यक्त केले असून कौस्तुभ आमटे यांच्या पत्नी पल्लवी यांनी "हा काळ आमटे कुटुंबासाठी कठीण असून आम्ही सर्व शीतल यांनी पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कटिबद्ध" असल्याचे म्हटले. याशिवाय सुहासिनी व शिरीष करजगी यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टला 'त्यांनी व्यक्त होणे 'अशी प्रतिक्रिया दिली आहे. आनंदवनवर समाजाने सतत विश्वास ठेवला आहे. तो कायम राखण्यासाठी आम्ही कार्यरत राहू, असेही पल्लवी आमटे म्हणाल्या.

हेही वाचा...नागपुरात भाजपला जबर धक्का, फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात महाविकास आघाडीचा झेंडा

आमटे कुटुंबीयांची चौकशी होण्याची शक्यता

शीतल आमटे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासात प्रगती होत नसल्याने पोलीस आता आमटे कुटुंबीयांची चौकशी करण्याच्या बेतात असून त्यातून एखादा धागा शोधला जाणार आहे. दुसरीकडे पोलिसांनी मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट नसल्याने आजही प्राथमिक पोस्टमोर्टम अहवाल जाहीर केलेला नाही.

Published by: Sandip Parolekar
First published: December 4, 2020, 10:16 AM IST
Tags: nagpur

ताज्या बातम्या