Home /News /news /

शहीद जवानाच्या कुटुंबाकरता उभं राहिलं केंद्र सरकार, मदतीसाठी केली मोठी घोषणा

शहीद जवानाच्या कुटुंबाकरता उभं राहिलं केंद्र सरकार, मदतीसाठी केली मोठी घोषणा

केंद्र सरकारच्या वतीनं माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली.

    साकोरी, 27 जून : गलवान घाटीत नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या दोन सहकाऱ्यांना वाचवताना गुरुवारी वीर मरण आलेले जवान सचिन मोरे यांच्यावर त्यांच्या गावी मालेगावच्या साकोरी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सगळ्या नागरिकांनी जड अंतकरणाने त्यांचे अंत्यसंस्कार केले. यावेळी मोरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशात केंद्र सरकारच्या वतीनं माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, खासदार डॉ सुभाष भामरे यांनीही शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सुभाष भामरे यांनी शहीद सचिन मोरे यांच्या कुटुंबाला केंद्राकडून 1 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा केली. सचिन मोरे यांच्या पत्नीला सरकारी नौकरी तसंच त्याच्या तीनही मुलांचा शैक्षणिक सर्व खर्च सरकार करणार असल्याचं सुभाष भामरे यांनी सांगितलं. पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांनीही राज्य सरकारच्या वतीनं शहीद सचिन मोरे यांना श्रद्धांजली वाहिली. या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही असं आश्वासन यावेळी राज्य सरकारच्या वतीनं भुजबळ यांनी दिलं. सैन्यदलाच्या 14 सशस्त्र जवानांनी शहीद जवान सचिन मोरे यांना अखेरची सलामी दिली. मानाचा तिरंगा, सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद सचिनच्या पत्नी सारिकाला यांना सुपूर्त केला. वीर माता जिजाबाई, वीर पत्नी सारिका, लहानग्या दोन्ही मुली यांनी त्याचा स्वीकार केला. शहीद मोरे यांच्या अखेरच्या निरोपासाठी संपूर्ण गावात कडकडीत बंद आहे. पंचक्रोशीतील नागरिक या वीर जवानाला श्रद्धांजली देण्यासाठी गर्दी केली आहे. परिसरात शोककळा पसरलेली असून ज्या रथावरून अंत्ययात्रा काढली जाणार आहे त्याला फुलांनी सजवण्यात आलं आहे. शहीद मोरे यांच्या मागे आई, वडील, पत्नी, 2 मुली आणि 6 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. या विरपुत्राला श्रद्धांजली देण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे उपस्थित राहिले. शहीद सचिन मोरे हे एसपी- 115 रेजिमेंट अंतर्गत लडाख सीमेवर साधारण वर्षभरापासून तैनात होते. सुमारे 17 वर्ष अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. संपादन - रेणुका धायबर
    First published:

    Tags: India china border

    पुढील बातम्या