मुंबई, 2 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. लोक माझे सांगाती या पवारांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनावेळी शरद पवारांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना राजीनामा देऊन धक्का दिला. शरद पवारांच्या या राजीनाम्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात पवारांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते भावुक झाले. या सगळ्यांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. अजित पवार, प्रफुल पटेल यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरीही नेते आणि कार्यकर्ते ऐकत नव्हते.
#WATCH | NCP workers protest outside YB Chavan Centre in Mumbai after party chief Sharad Pawar announced to step down from his post. pic.twitter.com/UMBPQ2w28G
— ANI (@ANI) May 2, 2023
दुसरीकडे वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. या कार्यकर्त्यांना आवाहन करण्यासाठी सुप्रिया सुळे या स्वत: वाय.बी.चव्हाण सेंटरच्या बाहेर आल्या. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच आपण एकत्र जेऊ, असं आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केलं. सुप्रिया सुळे यांच्या या आवाहनानंतरही कार्यकर्ते उपोषणावर ठाम आहेत. अखेर सुप्रिया सुळे या तिथून निघून गेल्या.
शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपोषणाला, सुप्रिया सुळेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न#SharadPawar #NCP #SupriyaSule pic.twitter.com/LfFAzoFE1u
— News18Lokmat (@News18lokmat) May 2, 2023
राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती नेमली जाईल. ही समिती अध्यक्षपदाबाबत निर्णय घेईल, असं शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आता अनिल देसाई आणि सुभाष देसाई सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेणार आहेत. तसंच उद्धव ठाकरेही शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर रोहित पवार सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. राष्ट्रवादीचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवार यांनी निर्णय बदलावा अशी मागणी करत त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे.

)







